वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
निर्यातदारांना भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सेझ धोरणाची पुनर्रचना
Posted On:
10 JAN 2020 7:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जानेवारी 2020
वाणिज्य, उद्योग आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत देशातील विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) धोरणाबाबत बाबा कल्याणी समितीच्या उर्वरित शिफारशींचा आढावा घेतला. या बैठकीला बाबा कल्याणी समितीचे सदस्य तसेच महसूल, विधि विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी निर्यातदारांना भेडसावणाऱ्या जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सेझ धोरणाच्या पुनर्रचनेचा आढावा घेतला. सध्याची जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्यासाठी उर्वरित शिफारशी लागू करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1599078)
Visitor Counter : 222