संरक्षण मंत्रालय

वार्षिक आढावा – 2019 संरक्षण मंत्रालय

Posted On: 27 DEC 2019 6:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2019

2019 हे संपूर्ण वर्ष संरांक्षण मंत्रालयासाठी उल्लेखनीय घडामोडींनी भरलेले होते.देशातील उच्च संरक्षण व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणण्याच्या निर्णयामध्ये, सर्विस चीफ बरोबरीचा पगार आणि विशेषाधिकार असणाऱ्या चार स्टार जनरलच्या रँकमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) हे पद निर्माण करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. सीडीएस हे संरक्षण मंत्रालयामध्ये तयार करण्यात आलेल्या सैन्य व्यवहार विभागाचे (डीएमए) प्रमुखही तसेच त्याचे सचिव म्हणून देखील काम पाहतील. 15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना सांगितले होते की, भारताकडे खंडीत दृष्टीकोन नसावा. आपल्या संपूर्ण लष्करी सामर्थ्याने एकजुटीने काम करून पुढे मार्गक्रमण केले पाहिजे. तिन्ही (सेवा) एका वेगात एकाचवेळी पुढे यायला हव्यात. त्यांच्यामध्ये चांगला समन्वय असला पाहिजे आणि आपल्या नागरिकांच्या आशा आणि आकांक्षांशी संबंधित असला पाहिजे. हे जगाबरोबर बदलत्या युद्ध आणि सुरक्षा वातावरणाशी सुसंगत असले पाहिजे...हे पद (सीडीएस) निर्माण केल्यानंतर तिन्ही सेवांना उच्च पातळीवर प्रभावी नेतृत्व मिळेल. या निर्णयामुळे सशस्त्र सेना यांच्यात सुसंवाद साधला जाईल आणि ते अधिक प्रभावीपणे कार्य करतील. संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र सेना यांच्याशी संबंधित इतर प्रमुख निर्णय आणि कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत:

  • इंडिया गेट जवळ 25 फेब्रुवारी रोजी झालेल्या एका समारंभ सोहळ्यात पंतप्रधानांनी, राष्ट्रीय युद्ध स्मारक देशाला समर्पित केले. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशसेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे.
  • 26 फेब्रुवारीच्या पहाटेच्या सुमारास गुप्तचर यंत्रणेने केलेल्या कारवाईमध्ये भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद (जेईएम) च्या सर्वात मोठ्या प्रशिक्षण शिबिरावर हल्ला केला होता. या कारवाई मध्ये, फियादिनसाठी प्रशिक्षण घेणारे जेईएम दहशतवादी, ज्येष्ठ कमांडरस आणि जिहादिंचे गट मोठ्या संख्यने उध्वस्त करण्यात आले. बालाकोट मधील या शिबिराचा प्रमुख जेईएमचा म्होरक्या मसूद अझरचा मेहुणा मौलाना युसुफ अझर होता. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या आत्मघाती दहशतवादी हल्याला चोख प्रत्युतर देण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता ज्यामध्ये केंद्रीय राखीव दलाचे (सीआरपीएफ) 40 शूर जवान शहीद झाले होते.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ऑक्टोबर मध्ये फ्रांस मधील मेरीनाक येथे राफेल या लढाऊ विमानाच्या हस्तांतरण कार्यक्रमात सहभागी झाले होते. भारतीय वायू दलाच्या इतिहासातील हा सुवर्ण दिन आहे. हे मध्यम बहु-आयामी लढाऊ विमान भारताला मजबूत करेल आणि या प्रदेशात शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वायू दलाला प्रोत्साहन देईल. संरक्षण मंत्र्यांनी यावेळी या लढाऊ विमानातून छोटेसे उडाण देखील भरले.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सप्टेंबर 2019 रोजी बंगळूरू येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) विमानतळावरून ‘तेजस’ या हलक्या लढाऊ विमानातून (एलसीए) उड्डाण करणारे पहिले संरक्षण मंत्री ठरले.
  • संरक्षण पीएसयुच्या सुवर्ण जयंती सोहळ्याच्या निमित्ताने 3 ऑगस्ट रोजी हैद्राबाद मधील भारत डायनामिक्स लिमिटेडच्या आवारात आयोजित एका कार्यक्रमात संरक्षण मंत्र्यांनी, मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र भारतीय वायू दलाला सुपूर्द केले.
  • राजनाथ सिंह यांनी 18 जून रोजी शांतता क्षेत्रात तैनात असलेल्या तीन सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांसाठी ‘रेशन इन काइंड’ पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली.
  • संरक्षण मंत्र्यांनी युद्ध दुर्घटनेच्या सर्व श्रेणीतील जवानांच्या नातेवाईकांना देण्यात येणारे दोन लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य चौपट करून ते आठ लाख रुपये करायला तत्वतः मंजुरी दिली आहे. युद्ध दुर्घटनेतील जवानांचे नातेवाईक त्यांच्या शासकीय निवासस्थानात आता तीन महिन्यांऐवजी एक वर्षा पर्यंत राहू शकतात.
  • सीमावर्ती भागातील रस्ते आणि पुलाच्या कनेक्टीव्हीटी मध्ये मोठ्या प्रमाणत सुधारणा होत आहेत, संरक्षण मंत्र्यांनी 20 जुलै रोजी जम्मू आणि काश्मीर मधील सांबा जिल्ह्यात 617.40 मीटर लांबीचा बसंतर पूल आणि कठूआ जिल्ह्यातील 1 किलोमीटर लांबीच्या उझ पुलाचे उद्‌घाटन केले.
  • राजनाथ सिंह यांनी 21 ऑक्टोबर रोजी पूर्व लडाखमधील दुर्बूक आणि दौलत बेग ओल्डि यांना जोडणाऱ्या धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या कर्नल चेवांग रिंचन पुलाचे उद्‌घाटन केले.
  • संरक्षण मंत्र्यांनी 15 नोव्हेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील लोअर दिबांग खोऱ्याला पूर्व सियांगशी जोडणाऱ्या रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या सिसेरी नदी पुलाचे उद्‌घाटन केले.
  • माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी रोहतांग पास खालील रणनीतिकदृष्ट्या महत्वाच्या बोगद्याला त्यांच्या जयंती दिनी अर्थात 25 डिसेंबर 2019 रोजी त्यांचे नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दिवंगत अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 3 जून 2000 रोजी रोहतांग पास खाली रणनीतिक बोगदा बांधण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) भौगोलिक भूभाग आणि हवामानातील मोठ्या आव्हानांवर मात करण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यामध्ये 587-मीटर सेरी नाला फॉल्ट झोनचा सर्वात कठीण भाग समाविष्ट आहे.
  • राजनाथसिंह यांनी 9 सप्टेंबर रोजी गोवा किनाऱ्यावरून आपला संपूर्ण दिवस आय एन एस विक्रमादित्य वर समुद्रात घालवला. भारतीय नौदलाच्या सर्वात मोठ्या जहाजावरील मुक्कामादरम्यान संरक्षण मंत्री लढाऊ विमानांद्वारे गोळीबार आणि लढाऊ विमान वाहक डेक वरून रात्रीच्या वेळी हेलिकॉप्टरचे उड्डाण अशा विविध नौदल कारवाईचे साक्षीदार झाले.
  • २० फेब्रुवारी रोजी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते बंगळुरू येथे आंतरराष्ट्रीय एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शनाच्या १२ व्या द्वैवार्षिक परिषदेचे उद्‌घाटन झाले ज्यामध्ये 600 हून अधिक भारतीय कंपन्या आणि 200 परदेशी कंपन्यां सहभागी झाल्या होत्या. एकूण ६१ विमानांनी भाग घेतला होता.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशात प्लास्टिक वापराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी, स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून 7 डिसेंबर रोजी दिल्ली कॅंट येथे विशेष स्वच्छता जनजागृती रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. त्यांनी स्वतः परिसरातून कचरा उचलत एका कार्यक्रमात भाग घेतला. शालेय विद्यार्थ्यांसह 3000 हून अधिक लोकांनी या जनजागृती कार्यक्रमात सहभागी होत प्लास्टिक कचरा गोळा केला.

द्विपक्षीय संरक्षण सहकार्य

               द्विपक्षीय आणि बहुपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका, फ्रांस, रशिया, युक्रेन, जपान आणि दक्षिण कोरियासह विविध देशांना भेटी दिल्या. या दौऱ्यां दरम्यान दहशतवाद विरोधी कारवाया, भारत-प्रशांत महासागर आणि दक्षिण चीन सागर यासह अनेक विषयांवर चर्चा झाली.

  • राजनाथ सिंह आणि डॉ. एस जयशंकर 18 डिसेंबर रोजी वॉशिंग्टन येथे आयोजित भारत आणि अमेरिकेच्या संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांमधील भारत-अमेरिका टू प्लस टू संवादात सहभागी झाले होते. अमेरिका-प्रशांत महासागर कमांड, केंद्रीय कमांड आणि आफ्रिका कमांड अंतर्गत भारतीय नौदल आणि अमेरिका नौदलासह लष्कर ते लष्कर सहकार्य सखोल करण्यासाठी उभय देश वचनबद्ध आहेत आणि उभय देशांच्या लष्कर आणि वायू दलामध्ये समान सहकार्य वृद्धिंगत करण्याचा मानस आहे.
  • 30 नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे भारत-जपान दरम्यान टू प्लस टू संवाद झाला. राजनाथ सिंह आणि डॉ. एस जयशंकर यांनी त्यांच्या जपानच्या मंत्र्यांसोबत बैठकीत भाग घेतला.  ते म्हणाले की या संवादातून द्विपक्षीय सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य अधिक सखोल होईल.
  • संरक्षण मंत्र्यांनी जपान दौऱ्या दरम्यान 2 सप्टेंबर रोजी टोकियो येथे जपानच्या संरक्षण मंत्र्यांसमवेत वार्षिक संरक्षणमंत्री बैठक घेतली. उभय मंत्र्यांनी विद्यमान द्विपक्षीय सहकारी व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या मार्गांवर चर्चा केली आणि या क्षेत्रातील शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी नवीनउपक्रम सुरु केले.
  • राजनाथ सिंह 17 नोव्हेंबरला 6 व्या आशियाई संरक्षण मंत्र्यांच्या बैठक-प्लसला (एडीएमएम-प्लस) उपस्थित राहण्यासाठी थायलंडची राजधानी बँकॉक येथे गेले. अमेरिका, थायलंड, जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या नेत्यांसमवेत त्यांनी विविध द्विपक्षीय बैठका घेत संरक्षण संबंध आणखी सुधारण्याच्या विविध मार्गांवर चर्चा केली.
  • कोरियाच्या दौऱ्यात राजनाथ सिंह यांनी 6 सप्टेंबर रोजी सेउल येथे कोरियाच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी कोरियन आणि भारतीय संरक्षण उद्योगांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबोधित केले. द्विपक्षीय संरक्षण उद्योग सहकार्य पुढच्या स्तरापर्यंत नेण्यासाठी भारत आणि कोरियाने एक पथदर्शी आराखडा तयार केला.
  • संरक्षण मंत्री आणि सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्यांनी 20 नोव्हेंबर रोजी सिंगापूर येथे आयोजित चौथ्या सिंगापूर-भारत संरक्षण मंत्र्यांच्या संवाद समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविले. उभय मंत्र्यांनी भारत आणि सिंगापूर यांच्यात वृद्धिंगत होत असलेल्या संरक्षण संबंधांबद्दल समाधान व्यक्त केले आणि या प्रदेशातील स्थिरतेला चालना देणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. सप्टेंबरमध्ये अंदमान समुद्रातील सिंगापूर-भारत-थायलंड सागरी कवायतींचे (एसआयटीएमएक्स) (SITMX) उद्‌घाटन झाले.
  • राजनाथ सिंह 2 नोव्हेंबर रोजी उझबेकिस्तानच्या ताश्कंद येथे आयोजित शांघाई सहकार्य संघटनेच्या सरकारच्या प्रमुखांच्या परिषदेच्या 18 व्या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी उझ्बेक संरक्षण मंत्र्यांशी चर्चा केली आणि सैन्य चिकित्सा आणि सैनिकी शिक्षणात सहकार्य वाढविण्यासाठी तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. ते भारत-उझबेकिस्तानच्या ‘डस्टलिक 2019’ या पहिल्याच संयुक्त कवायतीच्या उद्घाटन सोहळ्यात देखील सहभागी झाले होते.
  • राजनाथ सिंह आणि रशियन संरक्षण मंत्री मॉस्को येथे सैन्य आणि सैनिकी तांत्रिक सहकार्यावरील 19 व्या भारत-रशिया आंतर-सरकारी आयोगाचे सह-अध्यक्ष होते.
  • मोझांबिकमध्ये उच्चस्तरीय कामकाज सुरू ठेवून संरक्षण मंत्र्यांनी 30 जुलै रोजी मापुटो येथे गृहराज्यमंत्री जामेम बासिलिओ माँटेरो यांच्याशी चर्चा केली. संरक्षण मंत्र्यांनी गृहराज्यमंत्री यांना 44 एसयूव्ही भेट दिल्या.
  • मोझांबिकचे संरक्षण मंत्री भारत दौर्‍यावर आले आणि 2 नोव्हेंबर रोजी राजनाथ सिंह यांच्यासमवेत बैठक केली. उभय पक्षांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करण्याच्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला.
  • मालदीवच्या संरक्षणमंत्र्यांनी जानेवारीत भारताचा अधिकृत दौरा केला. मंत्र्यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली आणि उभय पक्षांनी  मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलाच्या क्षमता वाढीसाठी आणि प्रशिक्षण आवश्यकतेसाठी योगदान देण्याच्या भारताच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.
  • फेब्रुवारी महिन्यात निर्मला सीतारमण ह्या जर्मनी दौर्‍यावर गेल्या आणि जर्मनीच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली. भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीचा महत्त्वाचा भाग म्हणून दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या संपूर्ण व्याप्तीचा सविस्तरपणे आढावा घेतला.
  • म्यानमारच्या लष्करी सेवेचे कमांडर-इन-चीफ (सीडीएस) सीनियर जनरल मीन ऑंग ह्लाइंग (एमएएच) जुलै-ऑगस्ट दरम्यान भारत दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
  • संरक्षण सहकार्य वृद्धिंगत करणे, म्यानमार संरक्षण सेवांना पुरविण्यात आलेले प्रशिक्षण आणि संयुक्त कवायतींचा आढावा घेणे, संयुक्त निगराणी आणि क्षमता वृद्धीच्या सहाय्यने सागरी सुरक्षा वाढविणे, वैद्यकीय सहकार्य, प्रदूषण प्रतिक्रिया आणि नवीन पायाभूत सुविधा विकसित करणे हा या चर्चेचा उद्देश होता. चर्चेच्या शेवटी भारत आणि म्यानमार यांनी संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार केला.
  • संरक्षण मंत्र्यांनी व्हिएतनाम पीपल्स आर्मीचे चीफ ऑफ जनरल स्टाफ आणि राष्ट्रीय संरक्षण उपमंत्री सिनियर लेफ्टनंट जनरल फान व्हॅन गियांग यांच्याशी चर्चा केली आणि 2 नोव्हेंबरला नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत उभय देशांमधील संरक्षण संबंध आणखी मजबूत करण्याच्या उपायांवर चर्चा केली. त्यांनी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची देखील भेट घेतली.

भारतीय सैन्य

  • घटनेच्या कलम 370 च्या तरतुदी रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता राखण्यास मदत केली.
  • चांगली कार्यक्षमता, अधिक समाधान आणि या क्षेत्रात तरुण अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता व्हावी या उद्देशांसह सैन्य मुख्यालयाच्या पुनर्रचनेसह सैन्यात सुधारणा करायला सुरुवात केली.
  • पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये तिसर्‍या पिढीच्या रणगाडा-विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र एनएजीची उन्हाळा यशस्वी चाचणी. डीआरडीओने विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राच्या चाचण्या 7-18 जुलै 2019 दरम्यान घेण्यात आल्या. दिवस आणि रात्र क्षमता असणार्‍या आणि कमीतकमी 500 मीटर आणि जास्तीत जास्त चार किलोमीटरच्या टप्प्यातील शत्रूंच्या रणगाड्यांना उध्वस्त करण्यासाठी एनएजी क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये टप्प्याटप्प्याने सैनिक शाळांमधील मुलींच्या प्रवेशाच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
  • भारतीय आणि नेपाळ सैन्या दरम्यानचा द्विपक्षीय वार्षिक सैन्य सराव सूर्या किरण-चौदावा डिसेंबर मध्ये नेपाळच्या रुपेंदेही जिल्ह्यातील सालिझंडी, नेपाळ आर्मी बॅटल स्कूल (एनएबीएस) येथे आयोजित करण्यात आला होता. मागील वर्षी जूनमध्ये उत्तराखंडमधील पिथौरागड येथे संयुक्त सैनिकी सरावाचा 13 वा भाग घेण्यात आला होता.
  • चीन राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी 01 ऑक्टोबर रोजी नातू ला, बम ला आणि किबिथु येथे औपचारिक सीमा कार्मिक बैठक (बीपीएम) आयोजित करण्यात आली होती. बीपीएम यंत्रणा एका महत्त्वपूर्ण इंटरफेसमध्ये विकसित झाली आहे जिथे स्थानिक विषयांवर चर्चा होईल आणि त्याद्वारे सीमा सुरक्षा पथकामध्ये आत्मविश्वास वाढेल. हे एलएसी च्या आजूबाजूच्या परिसरात शांती आणि शांतता सुनिश्चित करते.
  • जम्मू-काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यातील २२ विद्यार्थ्यांचा आणि तीन शिक्षकांचा समावेश असलेला भारतीय सैन्य पुरस्कृत वृद्धी दहा दिवसांच्या दौऱ्यानंतर हा चमू बटोटेला परतला ज्यात नवी दिल्ली आणि भारतीय सैन्य अकादमी, देहरादूनची भेट समाविष्ट आहे. सप्टेंबरच्या दहा दिवसांच्या कालावधीत किश्तवाड जिल्ह्यातील होतकरू तरुणांना भारतीय लष्करी अकादमी, देहरादूनसारख्या प्रमुख सैन्य संस्था, ऐतिहासिक वारसाचे प्रतीक असलेल्या राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, आणि राष्ट्रीय युद्ध स्मारक यासारख्या वास्तूंना भेट देण्याचा अनोखा अनुभव मिळाला.
  • पर्यावरण संरक्षणासंदर्भातील सरकारी धोरणांनुसार भारतीय लष्कराने ऊर्जा मंत्रालयांतर्गत केंद्रीय पीएसयूच्या संयुक्त उपक्रमाने एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) च्या भागीदारीत नवी दिल्ली येथे अधिकाऱ्यांच्या वापरासाठी ई कार वापरण्याचा पर्यावरणीय उपक्रम सुरू केला.
  • भारतीय लष्कराने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य करण्यास मदत केली. ऑगस्ट महिन्यात, पूर मदत कार्यासाठी 16 लष्करी तुकड्या आणि आणि 12 अभियंता कृती दलासह सुमारे 1000 सैन्य कर्मचारी कर्नाटकच्या बेळगाव, बागलकोट आणि रायचूर दुर्ग आणि महाराष्ट्रातील रायगड, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात नियुक्त करण्यात आल्या होत्या.
  • 30 मार्चला अरुणाचल प्रदेशच्या रोईंग जिल्ह्यात भारतीय सैन्याच्या 12 जणांच्या पथकाने पोलिस प्रतिनिधीसमवेत दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेच्या वायू दलातील  जुन्या विमानाचे भग्नावशेष गोळा करण्यासाठी गस्त घातली. लोअर दिबंग जिल्ह्यातील स्थानिक गिर्यारोहकांकडून पोलिसांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे, रोईंगपासून 30 कि.मी. अंतरावरील दुर्गम जागेवरील भग्नावशेष शोधण्यासाठी सैन्याचे विशेष गस्त पथक पाठवले होते.
  • पुण्यातील औंध मिलिटरी स्टेशन फॉरेन ट्रेनिंग नोड येथे 27 मार्च 2019 रोजी आफ्रिका-भारत फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज -2019 (एएफआयएनडीएक्स -19) चे उद्घाटन झाले. भारतीय पथकाचे प्रतिनिधित्व मराठा लाईट इन्फंट्रीने (जंगी पल्टन) केले होते. या 10 दिवसांच्या सरावात विविध रणनितिक कवायती दाखवल्या जातील ज्यात नागरिकांच्या संरक्षणाची व्यवस्था, स्थायी लढाऊ पथक तैनात करणे, सैन्य ताफ्याचे संरक्षण, गस्त घालण्याचे पैलू आणि तत्कालिक स्फोटक उपकरणांचे निष्क्रीयीकरण यासह संयुक्त कवायतींचा समावेश होता. सहभागी आफ्रिकन देशांमध्ये बेनिन, बोत्सवाना, इजिप्त, घाना, केनिया, मॉरिशस, मोझांबिक, नामीबिया, नायजर, नायजेरिया, सेनेगल, दक्षिण आफ्रिका, सुदान, टांझानिया, युगांडा, झांबिया आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.
  • श्रीलंकेच्या बडुल्ला जिल्ह्यातील दियाटलावा येथील दियाटलावा कवायत मैदानावर 26 मार्च ते 08 एप्रिल 2019 दरम्यान भारतीय आणि श्रीलंका सैन्यामध्ये चौदा-दिवसीय लष्करी अभ्यास मित्र शक्ती VI संपन्न झाला. उभय देशांमधील संयुक्त सरावाचा हा सहावा भाग होता. भारतीय सैन्याच्या तुकडीत बिहार रेजिमेंटमधील कंपनी गटाचा समावेश होता तर श्रीलंकेच्या लष्कराच्या फर्स्ट जिमुनु वॉच बटालियनचा समावेश होता.
  • राजनाथ सिंह यांनी 2 डिसेंबर रोजी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये 2019 मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी रक्षा मंत्री पुरस्कार प्रदान केले. आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता या क्षेत्रातील कामगिरी तसेच सार्वजनिक सेवा आणि भूमी व्यवस्थापन मधील नाविन्यपूर्ण आणि डिजिटायझेशनसाठी 2013 मध्ये डिफेन्स ईस्टेट पुरस्काराची स्थापना करण्यात आली.

भारतीय नौदल

सुरु करणे आणि बंद करणे

  • आयएन एलसीयू एल 56 या 08 एक्स आयएन एलसीयू (मार्क चतुर्थ) प्रकल्पाच्या सहाव्या जहाजाचे 29 जुलै रोजी विशाखापट्टणम येथे जलावतरण झाले. या प्रकल्पाचे सातवे जहाज एलसीयू एल 57 डिसेंबर 19 मध्ये वितरित करण्यात आले होते आणि नजीकच्या काळात ते कार्यान्वित होईल.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 28 सप्टेंबर रोजी मुंबईच्या नौदल गोदी मध्ये स्कॉर्पेन श्रेणी (प्रकल्प 75) ची दुसरी पाणबुडी आयएनएस खंदेरी आणि लढाऊ विमान वाहक गोदीचे कार्यान्वयन केले.
  • नौदल वायू तळ शिबपूरला 24 जानेवारी रोजी आयएनएस कोहसा म्हणून कार्यान्वित करण्यात आले.
  • किनारपट्टीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विमान मालमत्तांच्या स्थापनेसाठी 22 जुलै रोजी मीनांबक्कम येथे आयएएनएस 313 आणि 2 नोव्हेंबर रोजी आयएनएएस 414 हे पोरबंदर येथे सुरू झाले.
  • कानपूरच्या एचएएल येथे 28 जानेवारी रोजी 12 नवीन डोर्नियर कॉन्ट्रॅक्टची पहिली दोन विमान औपचारिकपणे भारतीय नौदलात दाखल झाली. अत्याधुनिक सेन्सर्ससह सुसज्ज असलेल्या या विमानांमुळे देशातील सागरी क्षेत्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेल्या निगराणीच्या प्रयत्नांना चालना मिळेल.
  • 2019 मध्ये भारतीय नौदलातील रणजित, कोळीकोड, एलसीयू एल-38 आणि एलसीयू एल-39 या जहाजांचे क्रियान्वयन रद्द करण्यात आले. ही सर्व जहाजे 30 वर्षाहून अधिक काळ देश सेवेत कार्यरत होती.

जहाजे/पाणबुडी यांचे क्रियान्वयन/बांधणी

  • यार्ड 12706 (इम्फाल), प्रोजेक्ट 15 बी (विशाखापट्टणम क्लास) चे तिसरे जहाज 20 एप्रिल रोजी मेसर्स एमडीएल, मुंबई येथे दाखल करण्यात आले.
  • 28 सप्टेंबर रोजी एमडीएल, मुंबई येथे पी17ए या लढाऊ विमानाच्या पहिला श्रेणीचे, ‘नीलगिरी’ विमानाचे उडाण करण्यात आले.
  • 06 मे रोजी एमडीएल, मुंबई येथे प्रकल्प 75 च्या चौथ्या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले. नौदलाच्या परंपरेनुसार पाणबुडीला आयएनएस वेला असे नाव देण्यात आले.
  • प्रोजेक्ट 15बी (विशाखापट्टणम श्रेणी ) चे यार्ड 12707 या चौथ्या जहाजाचा बांधणी सोहळा 07 नोव्हेंबर रोजी मे. शॉफ्ट शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड (एसएसपीएल), भरूच येथे आयोजित करण्यात आला होता.
  • यार्ड 12652 (मेसर्स एमडीएल मधील प्रोजेक्ट 17 ए चे दुसरे जहाज) चा बांधणी सोहळा 7 मे रोजी मेसर्स एमडीएल, मुंबई येथे झाला.
  • कोलकाता येथील मेसर्स जीआरएसई येथे 08 नोव्हेंबर रोजी यार्ड 3025, हे पहिले मोठे  सर्वेक्षण जहाज बांधणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
  • यार्ड 3023 (जीआरएसई येथे पी -१A ए चे दुसरे जहाज) चे उत्पादन 20 ऑगस्ट रोजी कोलकत्ताच्या मेसर्स जीआरएसई येथे पोलाद कापून जहाज उभारणी काम सुरू केले.

परदेशी तैनाती (ओएसडी)

  • भारतीय नौदल जहाज तारकशने 15 जून ते 15 ऑक्टोबर दरम्यान वेस्टर्न फ्लीट ओएसडी 01/19 मध्ये भाग घेतला. ओएसडी दरम्यान, या जहाजाने 13 देशांच्या बंदरांचा दौरा केला. या जहाजाने ब्रिटनसह रशिया नौदल दिन सोहळा कोंकण-19 आणि भारत आणि नायजेरिया यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या 60 व्या वर्धापनदिन सोहळ्यात भाग घेतला.
  • आयएन जहाज, कोलकाता आणि शक्ती यांनी 03 एप्रिल ते 31 मे दरम्यान ईस्टर्न फ्लीट ओएसडी 01/19 मध्ये भाग घेतला. ओएसडी दरम्यान, जहाजांनी कॅम रहन बे (व्हिएतनाम), किंगदाओ (चीन), बुसान (दक्षिण कोरिया) आणि सिंगापूरला भेट दिली. जहाजांनी कॅम रहन बे (व्हिएतनाम) येथे आयएन-व्हीपीएन द्विपक्षीय सराव, क्विंगडाओ (चीन) येथे पीएलए (एन) आयएफआर, बुसान (दक्षिण कोरिया) च्या एडीएमएम प्लस सरावामध्ये आणि सिंगापूर येथे सिंगापूर, आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन (आयएमडीएक्स), सागरी माहिती देवाणघेवाण सराव (एमआयआरआयएक्सएक्स) आणि सिमबेक्स 19 मध्ये भाग घेतला.
  • सह्याद्री आणि किल्तान या जहाजांनी 24 ऑगस्ट ते 21 नोव्हेंबर दरम्यान पूर्व फ्लीट ओएसडी 02/19 मध्ये बँकॉक (थायलंड), सिहानोकविले (कंबोडिया), कोटा किनाबालु (मलेशिया), ससेबो आणि योकोसुका (जपान), मनिला (फिलिपिन्स) आणि जकार्ता (इंडोनेशिया)  भाग घेतला. ओएसडी दरम्यान, जहाजांनी मलेशियासह माजी समुद्र लक्ष्मण आणि यूएसएन आणि जेएमएसडीएफसह मलबार -19 मध्ये भाग घेतला.
  • भारतीय नौदल, जपानी सागरी स्वयं संरक्षण दल (जेएमएसडीएफ) आणि अमेरिकन नौदल (यूएसएन) त्रिपक्षीय सराव मलबार -19 हे जपानमधील योकोसुका, येथे 26  सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता. सह्याद्री, किल्टन आणि सागरी गस्त विमान पी 8 आय या जहाजांनी या सरावात भाग घेतला. जेएमएसडीएफचे जहाज कागा, समिदारे, चोकाई, ओमी आणि पी 1 सागरी गस्त विमान यांनी प्रतिनिधित्व केले तर युएसएनचे प्रतिनिधित्व यूएसएस मॅक कॅम्पबेल, पेकोस आणि अणु पाणबुडी ओखोलामा सिटी यांनी केले.
  • पीएलए (एन) च्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त 23 एप्रिल रोजी किंगडाओ (चीन) हार्बर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्यूमध्ये कोलकाता आणि शक्ती जहाजांनी भाग घेतला होता.

नौदल संचालन/उपक्रम

  • आयओआरमधील महत्त्वाचे सागरी महत्त्व असलेल्या क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय समुद्री हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आणि सतत / जवळपास निरंतर उपस्थिती राखण्याच्या उद्देशाने हिंद महासागर प्रदेशातील हितसंबंधित क्षेत्रामध्ये मिशन आधारित दल तैनात केली जात आहे. पंतप्रधानांच्या 'सगळ्यांसाठी सुरक्षा आणि विकास (सागर)' या दृष्टीकोनातून या उपयोजन देखील सुसंगत होत्या. आयएन जहाजे आणि विमान नियमितपणे ओमानचे आखात/ पर्शियन आखात, अदन / लाल समुद्र आखात, दक्षिण आणि मध्य हिंद महासागर प्रदेश (आयओआर) मध्ये, सुंदा सामुद्रधुनीपासून, अंदमान समुद्राच्या/माल्लाक्का सामुद्रधुनी आणि बंगालच्या उपसागराकडे जाणार्‍या मार्गावर तैनात केले जातात. या तैनातीमुळे सुधारित समुद्री अधिकारक्षेत्रात जागरूकता, आयओआर सागरी किनाऱ्यावर जलद एचएडीआर सहाय्य, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय समुद्री समुदायाची सुरक्षा आणि क्षमता विकास आणि क्षमता निर्माण कार्यक्रमांच्या माध्यमातून मैत्रीपूर्ण नौदलासह परिचालन गुंतवणूकीची सोय झाली आहे. या तैनातीमुळे संपूर्ण आयओआर मध्ये विविध एचएडीआर / एसएआर कारवाईमध्ये 'प्रथम प्रतिसादकर्ता' म्हणून सक्षम केले आहे.
  • अनुक्रमे मे आणि जून 19 मध्ये फूजैराह आणि ओमानच्या आखातामध्ये रणगाड्यांवर हल्ला झाल्यानंतर, आयएनएने आखाती प्रदेशातून जाणाऱ्या भारतीय ध्वजांकित व्यापारी जहाजांची (आयएफएमव्ही) सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ओपी 'संकल्प' चालविला.
  • आयएन मधील सर्वात मोठा द्वैवार्षिक युद्ध खेळ,आयओआरमध्ये थिएटर स्तरीय व्यवहार्य दक्षता सराव (टीआरओपीएक्स -19) 7 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान घेण्यात आला. या सरावाचे मुख्य उद्दिष्ट संचलनाच्या मोठ्या युद्ध क्षेत्रात नौदलाच्या युद्धनौकेच्या कौशल्यांना सानुग्रह देणे हे होय.

 

सागरी किनाऱ्यांची सुरक्षा आणि चाचेगिरी विरुद्ध कारवाई

  

  • पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारत सागरी किनारा संरक्षण सराव, सी व्हीजील-19 चे 22-23 जानेवारी रोजी भारताच्या संपूर्ण किनारपट्टीवर आणि विशेष आर्थिक क्षेत्रात याचे आयोजन केले होते. किनारपट्टीच्या संरचनेत सामील असलेल्या सर्व एजन्सीस एकाच वेळी कार्यान्वित करण्याच्या आणि त्यातील तफावती आणि उपाययोजना दूर करण्याच्या उद्देशाने हा सराव आयोजित करण्यात आला होता. भारतीय नौदलाव्यतिरिक्त भारतीय तटरक्षक दल आणि देशाच्या किनारपट्टीच्या सुरक्षा चौकटीत सहभागी इतर सर्व भागधारकांनी या सराव मध्ये भाग घेतला.
  • एल अँड एम बेटांसह भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील पृष्ठभाग आणि हवाई किनारपट्टीवर पाळत ठेवण्यासाठी जहाजे आणि विमान तैनात केले जातात. पूर्वेकडील किनारपट्टीवरील पाळत ठेवण्याच्या उपाययोजनांमध्ये वाढ करण्यासाठी पूर्व किनारपट्टी आणि अंदमान आणि निकोबार बेटांवरही अशाच प्रकारच्या योजना करण्यात आल्या आहेत.
  • हिंद महासागर प्रदेशात जहाजांना सुरक्षा पुरविण्याच्या त्याच्या व्यापक भूमिकेचा एक भाग म्हणून, भारतीय नौदलाने एडनच्या आखातमध्ये चाचेगिरी विरुद्ध गस्तीसाठी एक जहाज तैनात केले आहे. 19 नोव्हेंबरपर्यंत एकूण 75 युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. आयएन, अफेनच्या आखाती देशात तैनात असलेल्या परदेशी देशांबरोबर जल अभ्यास देखील करते. भारतीय व्यापाराची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी या प्रदेशातील भारतीय नौदलाची उपस्थिती राखली जात आहे.
भारतीय वायू सेना
संपादन  
  • शांतता काळातही ड्रोनच्या सर्व प्रकारच्या धोक्यासह अलिकडच्या काळात हवाई संरक्षण आव्हाने अनेक पटींनी वाढली आहेत. प्रतिस्पर्धी क्रुझ क्षेपणास्त्रासह तटस्थ शस्त्रास्त्रे, प्रक्षेपणास्त्र आणि युद्ध सामुग्री यांच्या तैनातीमुळे ही आव्हाने उभी राहिली आहेत.
  1. लांब पल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या पाच स्क्वाड्रन अर्थात एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणेसाठी रशिया सरकारसोबत करार झाला आहे. पहिल्या स्क्वॉड्रॉनची उपकरणे 2020 च्या मध्यामध्ये समाविष्ट केली जाण्याची शक्यता आहे.
  2. डीआरडीओ आणि आयएआय यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या आयएएफ या  मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीचे 18 स्क्वॉड्रॉन खरेदी करीत आहे. 2020 च्या सुरूवातीला मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करनाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीचा समावेश होईल.
  3. सात अतिरिक्त स्वदेशी बनावटीच्या आकाश पथकांसाठी आणि संबंधित तज्ञांच्या पायाभूत सुविधांसाठी सप्टेंबर 2019 मध्ये करारावर स्वाक्षरी करण्यात आली. 2021 च्या सुरवातीला इंडक्शन सुरु होईल.
  • राफेल विमान: हवाई दलाची लढाऊ क्षमता वाढविण्यासाठी आणि लढाऊ पथकांची संख्या सुधारण्यासाठीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. राफेल हे बहुपयोगी लढाऊ विमान आहे ज्याच्याकडे लांब पल्ल्याच्या लक्ष्यावर भेदक मारा करण्याची क्षमता आहे आणि आम्हाला आमच्या शत्रूंच्या विरोधात मजबूत शस्त्रास्त्रे आणि प्रणाली प्रदान करेल. विमानाचे वितरण तसेच आयएएफ जवानांचे प्रशिक्षण सुरू आहे.
  • अतिरिक्त एसयू-30 एमकेआय विमान: आयएएफने 272 एसयू -30 एमकेआय विमानांसाठी विविध करारनाम्या अंतर्गत करार केला होता. सध्या ब्लॉक IV करारा अंतर्गत वितरण सुरू आहे आणि मार्च 2020 पर्यंत संपण्याची शक्यता आहे. एसयु -30 एमकेआय हे सध्या आयएएफच्या ताफ्यामधील सर्वात मोठे आणि सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान आहे.
  • अपाचे हेलिकॉप्टर: अपाचे हे दोन आसनी, दिवस/रात्र तसेच सर्व हवामानात उड्डाण भरू शकणारे शक्तिशाली हेलीकॉप्टर आहे. हे अत्यंत चपळ, युद्ध हानीमध्ये तग धरून राहणारे आणि युद्ध क्षेत्रात देखील सहजपणे देखरेख शक्य असणारे लढाऊ हेलिकॉप्टर आहे. हेलिकॉप्टर उष्णकटिबंधीय आणि वाळवंटात प्रदीर्घ कार्य करण्यास सक्षम आहे. हवाई लढाई, एडी, सीआय ऑप्स, यूएव्ही निष्क्रीयीकरण, सीएसएआर, शहरी संग्राम या सगळ्यासाठी हे तैनात करण्यास सक्षम असलेले बहुआयामी नेटवर्क केंद्रीय व्यासपीठ असल्याने हे विमान आयएएफच्या सर्व आवश्यकता तसेच सैन्याच्या आक्रमण दलाची आवश्यकता पूर्ण करते. अग्नी नियंत्रण रडार (एफसीआर) च्या अत्याधुनिक सुविधेने सज्ज, एएच-64 मध्ये दिवस, रात्र आणि दृश्यात्मकतेच्या कमी परिस्थितीत लक्ष्य शोधणे, त्याचा मागोवा ठेवणे आणि त्याला गुंतवून ठेवण्याची क्षमता आहे. यापूर्वी 17 हेलिकॉप्टर वितरित करण्यात आली आहेत.
  • चिनूक हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर (एचएलएच): 15 एक्स चिनूक हेलिकॉप्टरचे वितरण मार्च 2019 पासून सुरू झाले असून मार्च 2020 पर्यंत पूर्ण होईल. मार्च 2019 पासून हेलीकॉप्टरचे इंडक्शन सुरु झाले. आतापर्यंत दहा हेलिकॉप्टर मिळाली आहेत.
  • अस्त्र: डीआरडीओने डिझाइन आणि विकसित केलेले अस्त्र बीव्हीआर क्षेपणास्त्राच्या कामगिरीचे मूल्यांकन केले असून परदेशी अन्वेषकासोबत क्षेपणास्त्र गोळीबारात ते यशस्वी झाले आहे. लढाऊ विमानांसाठी हे क्षेपणास्त्र घेण्याची आयएएफची योजना आहे.
  • एसयू -30 एमकेआय विमानावरील ब्राह्मोस या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे एकत्रीकरण: एसयू -30 एमकेआयवरील ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे एकीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. हे विमानाचे धोरणात्मक महत्त्व आणि लढाऊ क्षमता वाढवेल.
  • उडाण निरीक्षण प्रणाली विमानाचा समावेश (डॉर्निअर-228): आयएएफने आयएएफच्या तळांमधील आधुनिक विमानतळ पायाभूतसुविधांवर (एमएएफआय) उपलब्ध नौकानयनशास्त्र मदतीचे कॅट -२ कॅलिब्रेशन करण्यासाठी तळावर उडाण निरीक्षण प्रणाली (एफआयएस) सह डू -288 डॉर्नियर विमानाचा समावेश केला आहे. एफआयएस विमानाचा समावेश एमएएफआय मालमत्ता आणि नौदल मदितीमधील देशांतर्गत कॅलिब्रेशन सुलभ करेल.

श्रेणीसुधारणा

  • मिराज 2000: मार्च 2019  मध्ये अंतिम क्रियान्वयन अनुमती (एफओसी) डी अँड डी मिळाली आणि शृंखला उत्पादन चालू झाले.
  • मिग-29: सुधारीत विमानांना आघाडीच्या पथकात दाखल करण्यात आले आहे आणि ते ऑपरेशन्ससाठी वापरले जात आहेत. सुधारित विमाने अत्याधुनिक वैमानिकी, सुसज्जित हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्रांनी सुसज्ज आहेत आणि विमानातच पुन्हा इंधन भरण्याच्या सुविधेने सक्षम असल्यामुळे त्याच्या लढाऊ संभाव्यतेत लक्षणीय वाढ होते.
  • जग्वार डॅरिन- III: एचएएलने डॅरिन- जग्वार  विमानाच्या मानकात सुधारणा करून डॅरिन-III विमानात विकसित केले यामध्ये नवीन मिशन संगणकांचे एकत्रीकरण, कॉकपिट डिस्प्ले (एसएमडी, इंजिन आणि उडाण उपकरण प्रणाली), अग्नी नियंत्रण रडार, हायब्रिड नौकानायानशास्त्र प्रणाली आणि प्रगत पद्धतीसह ऑटोपायलट समाविष्ट होते. नवीन मिशन सॉफ्टवेअरद्वारे या प्रणालींच्या एकीकारणामुळे कॉकपिटचे पूर्णपणे कार्यशील काचेच्या कॉकपिटमध्ये रूपांतर केले आहे. प्राथमिक सेन्सर म्हणून रडारच्या एकीकारणामुळे, आकाश, जमिन आणि सागरातील लक्ष्ये शोधण्यात जग्वार विमानाची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढली आहे. डॅरिन-III विमानाच्या वैमानिकी क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये एफओसीसाठी उड्डाण चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. डॅरिन-III विमानावर अत्याधुनिक सेन्सरच्या एकीकरणामुळे हे विमान सामर्थ्यशाली हल्ल्यासाठी सज्ज झाले आहे. डिसेंबर 2019 पासून श्रेणीसुधारित विमानाचे वितरण सुरू होईल.

प्रकल्प

  • एअरबोर्न लवकर इशारा आणि नियंत्रण (AEW&C): AEW&C ही डीआरडीओने यशस्वीरित्या विकसित केलेली एक स्वदेशी प्रणाली आहे. दुसरे AEW&C विमान 11 सप्टेंबर 19 रोजी सीएबीएसने आयएएफला दिले.
  • एकात्मिक हवाई आदेश आंनी नियंत्रण प्रणाली (IACCS): IACCS हा पूर्णतः स्वदेशी प्रकल्प आहे जो सर्व सेन्सरना एकत्र करून संयुक्त हवामान परीस्थिती सांगून जलद निर्णय घ्यायला मदत करतो.

 

आंतराष्ट्रीय सराव

  • ईएक्स गरुडा: चार एसयू -30 एमकेआयने 1 ते 14 जुलै 19 दरम्यान फ्रान्सच्या माँट-डे-मार्सानमधील ईएक्स गरुडामध्ये भाग घेतला होता.
  • ईएक्स इस्टर्न ब्रिज: 15 ते 26 ऑक्टोबर 19 दरम्यान ओमनमधील ईएक्स इस्टर्न ब्रिज V मध्ये पाच मिग -29 सहभागी झाले होते. मिग- 29 एसीने परदेशात आंतरराष्ट्रीय सरावात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा सराव व्यावसायिकपणे घेण्यात आला आणि यावेळी मिग -29 च्या कामगिरीचे कौतुक केले गेले.
  • जेएमटी : सिंगापूर हवाई दलासह संयुक्त सैन्य प्रशिक्षण द्विपक्षीय टप्प्याचे नियोजन 14 ते 29 नोव्हेंबर 19 दरम्यान कलिकुंडा येथील वायुदलाच्या तळावर करण्यात आले होते. एसयू -30 एमकेआयने या सरावात भाग घेतला होता.

 

एचएडीआर

  • हवाई अग्निशमन कार्यवाही: तेरा (तामिळनाडू), कटरा, पठाणकोट, कसवली, मालवीय नगर, बांदीपूर (कर्नाटक) आणि सुंदरबन परिसरातील किनारपट्टीवरील व्यापारी जहाजांवरील अग्निशमन मोहिमेसाठी एमआय -17 V हेलिकॉप्टरने हवाई प्रयत्नांची व्यवस्था पुरवली. एकूण 93 सामाईक उडाण/52:20 तास/154 केएल पाणी वापरले आहे.
  • पूर मदत कार्यवाही:2019 (ऑपरेशन वर्षा): भारतीय वायुसेनेने अनेक राज्यांमध्ये (महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि बिहार) पूर मदत कार्यवाहीसाठी हेलिकॉप्टर तैनात केले होते. या कामासाठी हेलिकॉप्टरच्या विविध श्रेणींचा उपयोग करण्यात आला होता. एकूण 219 सामाईक उडाण/ 172: 10 तास हवाई उडाण करून 1061 व्यक्ती आणि 84.4 टन भार उचलण्यात आला.
  • दुर्घटना निर्वासन: आर्थिक वर्ष 2019-20 दरम्यान 25 ऑक्टोबर 19 पर्यंत 103 सामाईक उडाण 85 तासांचे हवाई उडाण करत 85 लोकांची सुटका करण्यात आली ज्यात नंदा देवी पास येथील हिमस्खलनानंतर अडकलेल्या 12 गिर्यारोहकांचा (ब्रिटीश नागरिक)समावेश आहे. एक महिन्याच्या 45 तास/47 सामाईक उड्डाणाच्या प्रयत्ना नंतर 4 गिर्यारोहक आणि 7 मरणाधीन व्यक्तींना सोडवण्यात आले.

हवाई दलामध्ये महिला सशक्तीकरण

  • एनसीसी विशेष प्रवेश: ‘सी’ प्रमाणपत्र असलेल्या महिला एअर विंग कॅडेट्सना पहिल्यांदाच एनसीसीची विशेष प्रवेश देण्यात आला. यामुळे त्यांना आयएएफच्या उड्डाण शाखेत शॉर्ट सर्व्हिस कमिशनड ऑफिसर बनण्यासाठी घेण्यात येणारी कोणतीही परीक्षा न देता थेट एसएसबीत प्रवेश मिळेल.
  • लढाऊ शाखेत समावेश: महिला वैमानिक आयएएफच्या वाहतूक आणि हेलिकॉप्टर शाखेत चांगली कामगिरी करत आहेत. वास्तविक प्रगती म्हणून, आयएएफने लढाऊ शाखेमध्ये महिला वैमानिकानाही समाविष्ट केले आहे. त्यानुसार तीन महिला प्रशिक्षणार्थींची पहिली तुकडी लढाऊ शाखेत सामील झाली. सध्या सहा जणी लढाऊ पथकांमध्ये तैनात आहेत तर दोन हॉक -132 एसीवर प्रशिक्षण घेत आहेत. 1 डिसेंबर 2019 मध्ये आणखी एका महिला प्रशिक्षणार्थीला लढाऊ शाखेत सामील करून घेण्यात आले.
  • धोरणात्मक नियुक्ती: परराष्ट्रातील भारतीय राजनैतिक पद पारंपारिक रित्या पुरुषांकडेच असायचे. विंग कमांडर अंजली सिंह या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांची आयएएफने रशियाच्या दूतावासामध्ये डेप्युटी एअर अटॅची म्हणून नियुक्त केले.
  • फ्लाइट कमांडर: विंग कमांडर शैलजा धामी यांना डिसेंबर 2003 मध्ये आयएएफच्या हेलिकॉप्टर शाखेत अधिकृत प्रवेश देण्यात आला. 18 डिसेंबरला तिला पीसी देण्यात आले. नोव्हेंबर 13 मध्ये त्या आयएएफमध्ये प्रथम महिला हेलिकॉप्टर क्यूएफआय बनल्या. त्यांच्या नावावर 2000 तासांहून अधिक उड्डाण आहेत. नुकतेच त्यांना आयएएफच्या कॉम्बॅट युनिटची प्रथम महिला फ्लाइट कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे (131 एफएसी फ्लॅट, हिंडॉनवेफ 26 ऑगस्ट 19).

भारतीय तटरक्षक दल

  • दक्षिणेकडील सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी संरक्षण मंत्र्यांनी 25 सप्टेंबर 2019 रोजी चेन्नई येथे भारतीय तटरक्षक दल जहाज (आयसीजीएस) ‘वराह’ तैनात केले.
  • भारतीय तटरक्षक दलासाठी 05 ऑफशोर गस्त जहाजाच्या मालिकेतील तिसरे जहाज, ‘सजग’चे  14 नोव्हेंबर, 2019 रोजी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्या पत्नी विजया श्रीपाद नाईक यांच्याहस्ते गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे औपचारिकपणे जलावतरण करण्यात आले. जीएसएलद्वारे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे, हे जहाज ओपीव्ही आयसीजीच्या ताफ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग होईल आणि त्यांचा उपयोग भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या संरक्षणासाठी केला जाईल.

 

जहाज संपादन

 

  • वर्षभरात खालील जहाज संपादनासाठी आरएफपी प्रस्ताव देण्यात आले आहेत: -

अनु.क्र.

प्रकल्पाचे नाव

प्रकल्प खर्च (करोड मध्ये

आरएफपी जारी करण्याची तारीख

शेरा

(a)

02 प्रदूषण नियंत्रण जहाज (पीसीव्ही) चे अधिग्रहण

673.00

27 फेब्रुवारी19

-

(b)

12 हवाई कुशन वाहनांचे (ACVs) अधिग्रहण

355.80

26 जून 19

ICG साठी 06 आणि IA साठी  06

(c)

8 जलद गस्त जहाजांचे  (FPVs) अधिग्रहण

803.68

26 जून 19

-

 

  • स्वदेशी डिझाइन आणि संरक्षण उपकरणांच्या विकासास प्रोत्साहन देण्यासाठी, सर्व आरएफपी ‘खरेदी (इंडियन-आयडीडीएम)’ श्रेणीअंतर्गत जारी करण्यात आल्या आहेत.
  • जहाजांचा समावेश: कॅलेंडर वर्ष 2019 मध्ये 11 सरफेस प्लॅटफॉर्म 02 ऑफ-शोअर गस्त जहाज (ओपीव्ही), 03 जलद गस्त जहाज (एफपीव्ही), 06 अवरोधक बोट्स (आयबी) समाविष्ट केल्या आहेत.

 

परदेशी सागरी संस्थांची क्षमता वाढवणे:

  • मोझांबिक नौदलाला अवरोधक बोट्स (आयबी) ची भेट : मोझांबिक नौदलाला दोन अवरोधक बोटी दिल्याबद्दल पीटीएम, टीएमचे महासंचालक के. नटराजन, यांनी माननीय आरएम यांच्या नेतृत्वाखालील  उच्चस्तरीय भारतीय प्रतिनिधीमंडळाचा भाग म्हणून 28-30 जुलै 19 या कालवधीतपासून मापुटोला भेट दिली. मोझांबिक नौदलाला या बोटींचे संचलन आणि देखभाल करण्यास मदत आणि प्रशिक्षण देण्यासाठी आयसीजीच्या चार सदस्यीय पथकाला मापुटो, मोझांबिक येथे नियुक्त करण्यात आले आहे. पथकाच्या नियुक्तीपूर्वी, मोझांबिक नौदलाच्या एका जवानाला  5-16 नोव्हेंबर या काळात आयबी संचलनामध्ये चेन्नई येथे १२ दिवस प्रशिक्षण देण्यात आले.
  • मालदीवला अवरोधक बोट भेट दिली : भारत सरकारने नोव्हेंबर 19 मध्ये मालदीवला एक आयसीजी अवरोधक बोट (सी -447) भेट दिली. आयबी संचलनामध्ये चेन्नई येथे 1 ते 13 ऑक्टोबर 19 दरम्यान एमएनडीएफ चालक दलाचे प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले होते.
श्रीलंका तटरक्षक दल जहाज सुरक्षा साठी सुटे : श्रीलंका तटरक्षक दलाच्या विनंतीनुसार, आयसीजीने जहाजाचे क्रियान्वयन सुरु ठेवण्यासाठी आवश्यक ते सुटे भाग देण्यात आले आहेत.

 
निरीक्षण करणे 
  • भारतातील सागरी प्रदेशात सागरी निरीक्षण करण्यासोबतच, समुद्र किनाऱ्यावरील राज्यांमध्ये  सागरी निरीक्षण करण्याकरिता आयसीजी जहाज आणि विमानही तैनात केले आहेत. 2019 मध्ये, आयसीजीने मालदीव ईईझेडमध्ये पाच विस्तारित विशेष आर्थिक क्षेत्र (ईईझेड) तैनात केले.
  • आयसीजीने 22-23 जानेवारी दरम्यान सर्व किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी राष्ट्रीय स्तरीय सागरी संरक्षण अभ्यास (सीडीई) ‘सी विजील -1’ आयोजित केला होता. समुद्रामार्गे उद्‌भवणाऱ्या धोक्यांविरूद्ध देशाच्या किनारपट्टी संरक्षण संघटनेची कार्यक्षमता सुदृढ करणे हा यामागील हेतू होता.

 

नागरी प्राधिकरणाला मदत

  • ऑगस्ट महिन्यात, किनारपट्टीच्या राज्यांत अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर आयसीजी जिल्हे आणि स्थानकांना नागरी प्रशासनास मदत करण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये जीवन रक्षक / बचाव यंत्रणेसह एकूण 53 सीजी डीआरटी एकत्रित करण्यात असून ते परिक्रमण पद्धतीने तैनात करण्यात आले. आयसीजी पथकाने एकूण 4418 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
  • भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) इशारा दिल्यानंतर, आयसीजीने बंगालच्या उपसागरातील  'फेणी' चक्रीवादळ, अरबी समुद्रातील 'वायू' चक्रीवादळ, 'क्यार’ चक्रीवादळ 'महा' चक्रीवादळ आणि 'बुलबुल’ चक्रीवादळा दरम्यान पूर्व-प्रभावी उपाययोजना केल्या.

 

किनारपट्टीची सुरक्षा

  • भारतीय तटरक्षक दलाने सर्व भागधारकांशी सल्लामसलत करून, किनारपट्टीच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यांवरील विविध संस्थांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य-प्रमाणित मानक कार्यप्रणाली (एसओपी) सुरू केली आहे. या एसओपीचे लक्ष्य किनारपट्टी सुरक्षा यंत्रणेची कार्यक्षमता वाढविणे आहे. यंत्रणा तसेच एसओपी प्रत्येक किनारपट्टीवरील राज्यांमध्ये द्विवार्षिक अभ्यासाद्वारे सत्यापित केल्या जातात, ज्यामध्ये सर्व भागधारक भाग घेतात. 2019 मध्ये आत्तापर्यंत एकूण 16 सागरी सुरक्षा अभ्यास घेण्यात आले आहेत.
  • गुप्तचर माहितीच्या आधारे, तटरक्षक दलाद्वारे समुद्री सुरक्षा ऑपरेशन्स देखील घेतली जातात / त्यात सहभागी होतात. 2019 मध्ये भारतीय तटरक्षक दलाने आतापर्यंत एकूण 45 सागरी किनारा सुरक्षा संचालन केली आहेत.

 

परदेशी बंदरांवर आयसीजी शिप्सची विदेशात तैनात

  • परदेशी तटरक्षक दलाशी आणि प्रदेशातील इतर सागरी संस्थांशी संवाद साधण्यासाठी भारतीय तटरक्षक दल वेळोवेळी जहाजे विदेशात तैनात करते. 19 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 06 आयसीजी जहाजांनी 15 परदेशी देशांना भेटी दिल्या.

 
संरक्षण संशोधन विकास संघटना (डीआरडीओ)
  • आयएएफ ने हवेतून हवेत मारा करणाऱ्या अस्त्र क्षेपणास्त्राच्या पाच चाचण्या केल्या: ओडिशाच्या चांदीपूर किनाऱ्यावरील एसयू -30 एमकेआय प्लॅटफॉर्मवरून डीआरडीओच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या अस्त्र क्षेपणास्त्राची (बीव्हीआरएएम) चाचणी घेण्यात आली. 16-19 सप्टेंबर 2019 दरम्यान या चाचण्या घेण्यात आल्या. भारतीय वायू दलाने प्रतीरुपक सर्व संभाव्य धोक्याच्या परिस्थितीत लक्ष्य विमानांविरुद्ध चाचण्या घेतल्या. या कालावधीत घेण्यात आलेल्या पाच चाचण्या, वेगवेगळ्या बाह्यस्वरूपामध्ये क्षेपणास्त्रांची चाचणी केली. यावेळी सशस्त्र आणि डागण्यासाठी सज्ज अशा तीन क्षेपणास्त्रांनी गतीशील लक्ष्यांचा अचूक ठाव घेत आपली क्षमता सिद्ध केली.  
  • एलसीएने (नौदल) लँडिंगची व्यवस्था केली: शोर बेस्ड टेस्ट फॅसिलिटी (एसबीटीएफ) आयएनएस हंसा, गोवा येथे लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (नेव्ही) चे 13 सप्टेंबर 2019 रोजी प्रथमच लँडिंग केले. या चाचणीमुळे भारतीय नौदलातील विमान वाहक जहाज विक्रमादित्य या स्वदेशी विमान वाहकावर लँडिंग करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • कमी वजन, अग्नी आणि खांद्यावर वाहून नेता येणारा रणगाडा प्रतिबंधक मार्गदर्शित क्षेपणास्त्राची चाचणी: आंध्र प्रदेशच्या कुर्नूलच्या कार्यक्षेत्रात 11 सप्टेंबर 2019 रोजी डीआरडीओच्या विमानाने स्वदेशी कमी वजनाचे, अग्निशामक आणि मनुष्यरहित रणगाडा प्रतिबंधक मार्गदर्शित क्षेपणास्त्र (एमपीएटीजीएम) विकसित केले. एमपीएटीजीएमच्या यशस्वी चाचणीची ही तिसरी मालिका होती. हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक एव्हिएनिक्ससमवेत अत्याधुनिक इन्फ्रारेड इमेजिंग सीकरसह एकत्रित केले गेले आहे. या चाचणीमुळे लष्कराला तिसऱ्या पिढीचे स्वदेशी एमपीएटीजीएम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या क्षेपणास्त्राची यापूर्वी 13 मार्च 2019 रोजी चाचणी घेण्यात आली.
  • डीआरडीओ ने भारतीय वायू दलाला दुसरी स्वदेशी एईडब्ल्यूएन्डसी प्रणाली हस्तांतरित केली: सेवा नेटवर्क केंद्रित क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी डीआरडीओ ने डिझाईन केलेल्या तीन स्वदेशी एईडब्ल्यूएन्डसी पैकी दुसरी वैमानिक लवकर इशारा आणि नियंत्रण (एईडब्ल्यूएन्डसी) प्रणाली, ‘नेत्रा’ 11 सप्टेंबर 2019 रोजी भारतीय वायू दलाला सुपूर्द केली. ही यंत्रणा पंजाबमधील भटिंडा वायू दलाच्या तळावर सुपूर्द करण्यात आली.
  • जलद प्रतिक्रिया क्षेपणास्त्र चाचणी : डीआरडीओने 4 ऑगस्ट 2019 रोजी एकात्मिक चाचणी रेंज, चांदीपुर येथून थेट हवाई लक्ष्यीकरणाच्या विरूद्ध अत्याधुनिक जलद प्रतिक्रिया जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची (क्यूआरएसएएम) अत्याधुनिक चाचणी केली. डीआरडीओने विकसित केलेल्या दोन क्षेपणास्त्रांची दोन लक्ष्यीकरणाविरूद्ध चाचणी करण्यात आली असून ती लक्ष्य साध्य करण्याची सगळी उद्दीष्टे पूर्ण करीत आहेत. क्यूआरएसएएम, बर्‍याच प्रगत तंत्रज्ञानासह, विविध श्रेणी आणि उंचीवर लक्ष्य ठेवण्यासाठी सज्ज आहे. वाहनावरील रडार आणि प्रक्षेपकावरील क्षेपणास्त्रासह प्रणालीची अंतिम संरचना तपासली आहे. यात स्वदेशी टप्प्याटप्प्याने अ‍ॅरे रडार, जडत्वीय नौकानायानशास्त्र प्रणाली सिस्टम, डेटा लिंक आणि आरएफ सीकर यांचा समावेश आहे आणि भारतीय लष्करासाठी अतिशय कमी वेळेत शोध आणि मागोवा घेण्याची क्षमता विकसित केली आहे. या क्षेपणास्त्राची यापूर्वी 26 फेब्रुवारी 2019 रोजी चाचणी घेण्यात आली होती.
  • देश अशा क्षमता असलेल्या देशांच्या निवडक गटात सामील झाला आहे. डीआरडीओने 27 मार्च 2019 रोजी ओडिशाच्या डॉ ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून ‘मिशन शक्ती’ ही उपग्रहविरोधी (एएसएटी) क्षेपणास्त्र चाचणी घेतली. डीआरडीओने विकसित केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण (बीएमडी) इंटरसेप्टर क्षेपणास्त्राने 'हिट टू किल' मोडमध्ये पृथ्वीच्या भोवती फिरत असलेल्या निम्न पृथ्वी कक्षेत (एलईओ) परिक्रमा करीत असलेल्या भारतीय उपग्रहाला यशस्वीरित्या लक्ष्य केले. हे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र दोन घन रॉकेट बूस्टरनी  सज्ज असलेले तीन-चरणांचे क्षेपणास्त्र होते. विविध श्रेणी सेन्सरकडून प्राप्त झालेल्या डेटाने हे सिद्ध केले आहे की हे मिशन आपली सर्व उद्दिष्ट पूर्ण करण्यात यशस्वी झाले आहे. या चाचणीने बाह्य जागेत आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची क्षमता दर्शविली आणि डीआरडीओच्या कार्यक्रमांचे सामर्थ्य आणि प्रबळ स्वरूप दर्शविले.
  • भारतीय वायू दलासाठी एलसीए तेजस एमके I चे अंतिम कार्यवाही परवाना: एका महत्त्वाच्या प्रसंगी, भारतीय वायुदलासाठी हलके लढाऊ विमान तेजस एमके I ला 20 फेब्रुवारी 2019 रोजी अनौपचारिकपणे अंतिम कार्यवाही परवाना (एफओसी) प्रदान करण्यात आला. आयओसी मानक तेजस जुलै 2016 पासून आयएएफच्या 45 व्या पथकात आपली सेवा प्रदान करत आहे.
  • एचईएमआरएल, पुणे येथे डीआरडीओचे इग्निटर संकुल: संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी 5 नोव्हेंबर 2019 रोजी पुण्यातील उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेत (एचईएमआरएल) संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) इग्निटर कॉम्प्लेक्सचे उद्‌घाटन केले. एचईएमआरएलने इग्निशन प्रणालीच्या डिझाइन, प्रक्रिया आणि मूल्यमापनासाठी अत्याधुनिक सुविधा तयार केल्या आहेत. सुविधेमध्ये प्रक्रिया, संयोजन आणि गोदाम आणि डिझाईन सेंटर आहे. प्रक्रिया इमारतींमध्ये सेव्ह शेकर, प्लॅनेटरी मिक्सर, ग्रॅन्युलेटिंग मशीन, पेलेटिंग मशीन इत्यादी दूरस्थपणे नियंत्रित अत्याधुनिक उपकरणे बसविली आहेत. प्रक्रिया इमारतींमध्ये दूरस्थपणे नियंत्रित अत्याधुनिक उपकरणे जसे की सीवे शेकर्स, प्लॅनेटरी मिक्सर, ग्रॅन्युलेटिंग मशीन, पेलेटिझिंग मशीन इत्यादी स्थापित केल्या आहेत. डिझाइन, मॉडेलिंग आणि अनुकरण प्रयोगशाळा; संयोजन आणि चाचणी केंद्र देखील या इग्निटर कॉम्प्लेक्सचा एक भाग आहे.
  • जमिन आणि आकाशातून दोन ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचे  यशस्वी प्रक्षेपण : डीआरडीओ, भारतीय वायुसेना आणि ब्रह्मोस यांनी संयुक्तपणे आज दोन ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी यशस्वीपणे पार पाडली, त्यापैकी प्रत्येकी एक जमीन आणि आकाशातून प्रक्षेपित करण्यात आले. प्रथम क्षेपणास्त्र प्रक्षेपण जमिन आधारित मोबाईल लाँचरकडून करण्यात आले, जेथे क्षेपणास्त्र एअरफ्रेम, इंधन व्यवस्थापन प्रणाली आणि डीआरडीओ डिझाइन केलेले शोधकांसह बहुतेक घटक स्वदेशी होते. या क्षेपणास्त्राचे दुसरे प्रक्षेपण भारतीय वायु दलाने (आयएएफ) एसयू -30 एमकेआय तळावरून समुद्राच्या लक्ष्याविरूद्ध केले.
  • ‘पिनाक’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी: पिनाक क्षेपणास्त्र यंत्रणेच्या उड्डाण चाचण्यांच्या मालिकेचा एक भाग म्हणून, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) 17 डिसेंबर 2019 रोजी दोन चाचण्या घेतल्या. पहिली चाचणी 19 डिसेंबर 2019 रोजी घेण्यात आली, त्यामध्ये 75 मि.मी. अंतरावर एक क्षेपणास्त्र डागण्यात आले.

 
संरक्षण उत्पादन
  • ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत संरक्षण निर्मितीला चालना देण्यासाठी 9 ऑगस्ट, 2019 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि भारतीय स्टार्ट-अप तसेच भारतीय आणि परराष्ट्र संरक्षण कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आयोजित परिषदेचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते.
  • संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ उपक्रमास आणखी प्रोत्साहन देण्यासाठी  राजनाथ सिंह यांनी खासगी क्षेत्रातील उद्योगांना 16 जुलै, 2019  रोजी रक्षा मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी शास्त्रास्र कारखाना आणि डीपीएसयूशी स्पर्धा करण्यास अनुमती दिली.
  • संरक्षण मंत्रालयाने संरक्षण उत्पादन विभागाचा (डीडीपी) डॅशबोर्ड जारी केला. डॅशबोर्ड सामान्य लोकांसाठी https://ddpdashboard.gov.in. वर उपलब्ध आहे. डीडीपी डॅशबोर्डमध्ये विभागाच्या प्रमुख उपक्रमांची प्रगती आहे, ज्यात संरक्षण निर्यात, संरक्षण ऑफसेट्स, संरक्षण उत्पादन, बौद्धिक संपत्ती हक्क दाखल (मिशन रक्षा ज्ञान शक्ती), मेक इन इंडिया संरक्षण प्रकल्प, संरक्षणामध्ये कार्यरत स्टार्टअप्स, संरक्षण कॉरिडोरमधील गुंतवणूक आणि संरक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प यांचा समावेश आहे.
  • राजनाथ सिंह यांनी संरक्षण खरेदी प्रक्रिया (डीपीपी) 2016 आणि संरक्षण खरेदी हस्तलिखित (डीपीएम) 2009 चे पुनरावलोकन करण्यासाठी महासंचालक (अधिग्रहण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.

 

डेफेक्सपो 2020

  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 9 सप्टेंबर 2019 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे डेफेक्सपो 2020 च्या शिखर समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. भारताची संरक्षण उत्पादन क्षमता तसेच जगातील अव्वल संरक्षण उत्पादन कंपन्यांचे प्रदर्शन करणारे विशाल प्रदर्शन प्रथमच 5 ते 8 फेब्रुवारी, 2020 रोजी लखनौ येथे पहिल्यांदा आयोजित करण्यात आले होते. संरक्षण मंत्र्यांनी www.defexpo.gov.in हे संकेतस्थळ सुरु केले आहे.
  • संरक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 4 नोव्हेंबर, 2019 रोजी नवी दिल्ली येथे डेफएक्सपो 2020 संबंधित राजदूतांच्या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले. परिषदेमध्ये 80 पेक्षा जास्त देशांच्या मिशन आणि संरक्षण संबंधित प्रमुखांनी भाग घेतला होता.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 27 डिसेंबर रोजी आगामी डीफेक्स्पो 2020 साठी मोबाइल अ‍ॅप सुरु केले. अ‍ॅपल स्टोअर आणि अँड्रॉइड प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध आहे. अ‍ॅपची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ‘माहिती द्या जोडा आणि अभिप्राय द्या ’. यावर दैनंदिन कार्यक्रमाची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

 

माजी-सेवाकर्मी कल्याण विभाग (डीईएसडब्ल्यू)

  • सशस्त्र सेना ध्वज दिना (एएफएफडी) च्या निमित्ताने, केंद्रीय सैनिक मंडळाने (केएसबी) डीईएसडब्ल्यूच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला तसेच माजी सैनिक (ईएसएम) आणि त्यांच्या पुनर्वसनात कॉर्पोरेट भारत कशी महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतो याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 02 डिसेंबर रोजी पहिल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी (सीएसआर) चे आयोजन केले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • संरक्षण सेवा (डीएसई) अंदाजपत्रकाव्यतिरिक्त, युद्ध विधवा, ईएसएम आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी एएफएफडी फंड हा मुख्य स्त्रोत आहे. आर्थिक वर्ष 2019 दरम्यान (9 डिसेंबर 2019 पर्यंत) 9.9 कोटी रुपये जमा झाले आहेत.
  • विभागाने तयार केलेल्या प्लॅस्टिकविरोधी कृती आराखड्यानुसाऱ सर्व संलग्न कार्यालये आणि क्षेत्रीय आस्थापनांना प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • कृती आराखड्यानुसार विभाग आणि त्याच्या संलग्न कार्यालयांनी 17 ऑगस्ट रोजी जलशक्ती अभियानावर देशव्यापी मोहीम हाती घेतली.
  • जनजागृती करण्यासाठी, प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि जेएसए आणि एसबीएवरील भविष्यातील पथदर्शक आराखडा तयार करण्यासाठी 06 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे जल शक्ती अभियान (जेएसए) आणि स्वच्छ भारत अभियान (एसबीए) या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
  • 31 ऑक्टोबर,सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन (राष्ट्रीय एकता दिवस) म्हणून साजरी केली जाते या दिवशी नवी दिल्ली येथे मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम, येथे आयोजित ‘रन फॉर युनिटी’ कार्यक्रमात माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

 

पुनर्वसन

  • डीआर (उत्तर) तर्फे 22 जून रोजी ‘रिंचन सभागृह’ लेह येथे उद्योजकता-सह-पुनर्वसन परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. दिग्गजांसाठी डीजीआर स्टॉल लावण्यात आला होता आणि हा कार्यक्रम संवादात्मक व्याख्यानमालेच्या रूपात घेण्यात आला.
  • केएसबी हेल्पलाईन (011-26717987) साठी 06 सप्टेंबर रोजी एक संवादात्मक व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम (आयव्हीआरएस) सुरू करण्यात आली असून एकाच वेळी हिंदी आणि इंग्रजी भाषेत 20 कॉल येऊ शकतात. यामुळे ईएसएमच्या तक्रार निवारणाचा  वेळ कमी होईल.
  • सुरक्षा एजन्सी योजना, ईएसएम कोळसा परिवहन व टिप्पर संलग्नक योजना, सीएनजीचे व्यवस्थापन, कंपनी मालकीत कंपनी संचालित (सीओसीओ) योजना यासारख्या स्वयंरोजगार योजनांद्वारे आणि बीपीसीएल / आयओसीएल / एचपीसीएल, तेल उत्पादन एजन्सींचे वाटप, मदर डेअरी दुधाचे बूथ / सफल बूथ, डीजीआर आणि राज्य सैनिक मंडळे यांनी ईएसएम प्लेसमेंट इ.द्वारे एकूण 65,483 ईएसएमंना रोजगार देण्यात आले.
  • खासगी क्षेत्रात नोकरीसाठी ईएसएम जॉब फेअरच्या माध्यमातून निर्माण झालेल्या रोजगारामध्ये वाढ झाली आहे. डीजीआर आणि भारतीय उद्योग संघा (सीआयआय) दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराच्या आधारे, ईएसएम जॉब फेअर आयोजित करण्यात आले आहेत. वर्ष 2019 दरम्यान घेण्यात आलेल्या जॉब फेअरचा तपशील खालीलप्रमाणे आहेः

सहभाग

ठिकाण

दिनांक

कॉर्पोरेट कर्मचारी

ईएसएम

नोकरीच्या रिक्त जागा (अंदाजे)

कोलकता

27 फेब्रुवारी 2019

17

1924

3180

गोवा

15 मार्च  2019

23

402

368

अहमदाबाद

23 ऑगस्ट 2019

31

1526

559

चंडीगड

11 ऑक्टोबर 2019

31

1090

2570

पुणे

16 ऑक्टोबर 2019

29

856

2779

चेन्नई

22 नोव्हेंबर 2019

42

1438

2430

कोलकता

29 नोव्हेंबर 2019

41

1815

1192

 

एकूण

214

9051

13078

                                                            

  • 16 सप्टेंबर, 2019 रोजी डीईएसडब्ल्यूच्या आदेशानुसार खालील चार माजी सैनिक संघटनांना मान्यता देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
  1. लढाईतील दिव्यांग (भारत)
  2. भारतीय माजी-सेवा संघ (आयईएसएल)
  3. वायू दल संघटना
  4. राष्ट्रीय माजी-सैनिक समन्वय समिती

 

आरोग्य सेवा

  • 8 जानेवारी रोजी, डीईएसडब्ल्यूने योल, शिमला (हिमाचल प्रदेश) आणि भुवनेश्वर (ओडिशा) येथे माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ईसीएचएस) ची दोन अतिरिक्त क्षेत्रीय केंद्रे स्थापित करण्यास मंजुरी दिली.
  • 30 जानेवारी रोजी ईसीएचएस लाभार्थ्यांना अधिकृत स्थानिक औषधविक्रेता (एएलसी) संबंधित तरतुदीत बदल करुन औषध पुरवठा करण्यास मान्यता देण्यात आली.
  • डीईएसडब्ल्यूने भारत आणि नेपाळमध्ये राहणाऱ्या आसाम रायफल्स निवृत्तीवेतनधारकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ईसीएचएस सुविधा देण्याचा आदेश जारी केला.
  • दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिक, आपत्कालीन अधिकारी, लघु सेवेतील अधिकारी आणि वेळेआधीच सेवानिवृत्त होणाऱ्या सैनिकांना माजी सैनिकांना ईसीएचएस सुविधा देण्याच्या सीसीएस आदेशांना मान्यता देण्यात आली आहे.
  • सर्व मुख्यालय आणि प्रादेशिक केंद्रांना सैन्य रुग्णालयांच्या ईसीएचएस ओपीडीमध्ये ईसीएसएस सदस्य आणि 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या कुटुंबियांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • ईसीएचएस लाभार्थ्यांना स्थानिक वैद्यकीय उपकरणे घेण्यास परवानगी देण्यात आली आहे ज्यासाठी लष्करी रुग्णालयाच्या तज्ञांव्यतिरिक्त सरकारी रुग्णालयातील तज्ञांच्या शिफारशींवर ईसीएचएस कमाल मर्यादा दर उपलब्ध आहेत.
  • ईसीएचएस लाभार्थ्यांना त्यांच्या सामान्य आजारांवर मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी 24x7 हेल्पलाईन कार्यान्वित केली गेली आहे.
  • दिल्ली / एनसीआरच्या ईसीएसएस पॉलीक्लिनिकमध्ये प्रायोगिक तत्वावर आयुष उपचार पद्धतीची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

सर्वसाधारण संरक्षण मालमत्ता संचलनालय (डीजीडीई)

  • छावणीतील रहिवाशांना एकाच व्यासपीठावर ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व छावणी मंडळासाठी सामायिक मोबाईल ऍप्लिकेशन अर्थात सीबी ई-सर्व्हिसेस सुरू करण्यात आले असून ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
  • शासनाने सुरू केलेल्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत, सर्व छावणी मंडळांनी स्वच्छ आणि हरित छावणी क्षेत्र तयार करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. सर्व 62 छावण्या हागणदारीमुक्त करण्यात आल्या आहेत.
  • तज्ञ समितीने शिफारस केल्याप्रमाणे आणि सर्व भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर अधिकृत छावणीच्या सदनिकांमध्ये शौचालये नसल्यास विद्यमान इमारतींमध्ये आधीपासूनच गटारे बांधलेली असल्यास शौचालाय बांधण्याची परवानगी देण्यासाठी सर्व छावणी मंडळास आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
  • दुरुस्तीच्या कामांच्या परिभाषामध्ये अंतर्गत विभाजन भिंत, समाविष्ट आहे, पॅरापेट भिंत किंवा कॉर्निस किंवा सज्जा, पायऱ्यांची दुरुस्ती, खराब झालेले छप्पर, पुन्हा फरशी बसविणे, प्लास्टरिंग आणि पॅच वर्क, पडणाऱ्या विटा किंवा दगडांची डागडूज्जी, फॉल्स सिलिंग, नळ आणि पाईप जोडणीची दुरुस्ती आणि इतर सेवांचा समावेश होतो.
  • या निर्णयामुळे छावणीमधील परिस्थिती सुधारेल आणि त्याद्वारे छावणीत राहणाऱ्या बर्‍याच कुटुंबाना याचा फायदा होईल.

 

भूमी व्यवस्थापन

 

  1. चालू वर्ष 2019 मध्ये 264 भाडेपट्टीचे नूतनीकरण / मुदतवाढ देण्यात आली आहे.
  2. वर्षभरात 15,155 फायली डिजिटल करण्यात आल्या आहेत.
  3. 2,65,095 एकर संरक्षण भूमीचे (छावणीच्या आतील आणि बाहेरील दोन्ही) सर्वेक्षण केले आहे.
  4. पायाभूत सुविधा / सार्वजनिक उपयोगिता प्रकल्पांसाठी संरक्षण जमीन हस्तांतरित करण्यासाठी २१ प्रकरणांमध्ये मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

 

सीमा रस्ते संघटना

 

  • बीआरओने देशातील अवघड आणि दुर्गम भागात अंदाजे 60,000 किलोमीटर लांबीचे रस्ते, 51,000 मीटर लांबीचे प्रमुख पूल, 19 विमानतळ आणि 2 बोगदे बांधले आहेत.
  • पंतप्रधानांनी पायाभरणी केलेले
  1. i. अखनूर-पुंछ रस्ता अखनूर-पुंछ रस्त्याचे दुपदरी राष्ट्रीय महामार्गात सुधारणा करण्याची योजना आहे. प्रस्तावित सुधारणेमध्ये चार बोगदे आणि बायपास देखील आहेत जे एडब्ल्यू कनेक्टिव्हिटीची निश्चिती प्रदान करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 फेब्रुवारी 19 रोजी या रस्त्याच्या कामाची पायाभरणी केली.
  2. ii. से ला बोगदा सर्व ऋतुंमध्ये तवांगला कनेक्टिव्हिटी प्रदान करणाऱ्या बालीपारा - चारदूर - तवांग या मार्गावरील 13960 फुट उंचीवरील से ला बोगद्याचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. 9 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याची पायाभरणी करण्यात आली.
  • लक्ष्यीत कामांची कामगिरी:  जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत बीआरओची कामगिरी खालीलप्रमाणे आहेः
कामे 
ए/यू 
20 नोव्हेंबर 2019 पर्यंतची कामगिरी 
निर्मितीची कामे 

किमी एक्विट सीएल 9


 
1123.46
सर्फेसिंग कामे 

किमी एक्विट सीएल 9


 

2099.58


 
रिसर्फेसिंग कामे 

किमी  सीएल 9


 
2339.38
कायमस्वरूपी कामे 
सी आर 

1601.15


 
बोगदा 
सी आर 

282.12


 
मुख्य पूल 
मीटर 

2557.64


 
  • प्रमुख पुलांचे उद्‌घाटन
  1. संरक्षण मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी 18 जाने 2019 रोजी अरुणचल प्रदेशमध्ये  उदयक प्रकल्प अंतर्गत रोडिंग - कोरोनू - पाय मार्गावरील डीफो नदीवरील डिफो पुलाचे उद्‌घाटन केले.
  2. लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, जीओसी इन-सी नॉर्दन कमांड यांनी 17 जाने 2019 रोजी जम्मू-काश्मीर मध्ये संपर्क प्रकल्प अंतर्गत जम्मू-राजौरी-पुंछ मार्गावरील सुराणा नदीवरील कलाई पुलाचे उद्‌घाटन केले.
  3. ईशान्येकडील विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री, कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन, अणु उर्जा विभाग आणि अंतराळ विभाग मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 8 मार्च 2019 रोजी दिल्ली येथून व्हिडिओ लिंकद्वारे जम्मू-काश्मीर मध्ये संपर्क प्रकल्प अंतर्गत पारोल - कोरेपन्नू -राजपुरा या मार्गावरील बेईन पुलाचे ई- उद्‌घाटन केले.
  4. खासदार जुगल किशोर यांनी 8 मार्च 2019 रोजी जम्मू-काश्मीर मध्ये प्रकल्प संपर्क अंतर्गत अखनूर-पल्लवलावाला मार्गावरील ढोक नाल्यावरील ढोक पुलाचे उद्‌घाटन केले.
  5. लेफ्टनंट जनरल सुरिंदर सिंग, पीव्हीएसएम, एव्हीएसएम *, व्हीएसएम, जीओसी, पश्चिम कमांड यांनी 4 एप्रिल 2019 रोजी हिमाचल प्रदेशातील प्रकल्प दीपक अंतर्गत एनएच 05 (किंगल - रामपूर रोड) वरील अवेरी पट्टी आर्मी कॅम्पकडे जाणाऱ्या अवेरी पट्टी पुलाचे उद्‌घाटन केले.
  6. लेफ्टनंट जनरल हरीश ठुकराल, पीव्हीएसएम, एसएम, जीओसी यूबी क्षेत्र यांनी 6 जून 2019 रोजी उत्तराखंड राज्यातील शिवालिक प्रकल्पांतर्गत

नागा-सोनम मार्गावरील जाद गंगा -2 पुलाचे उद्‌घाटन केले.

  1. 14 जून 2019 रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेन्द्रसिंग रावत यांनी उत्तराखंड राज्यातील प्रकल्प शिवालिक अंतर्गत ग्वाल्दम-सिमली मार्गावरील मालोट पुलाचे उद्‌घाटन केले.
  2. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 20 जुलै 2019 रोजी डॉ. जितेंद्र सिंह, एमओएस, पीएमओ आणि सीओएएस यांच्या उपस्थितीत जम्मू आणि काश्मीर क्षेत्रातील प्रकल्प संपर्कांतर्गत पारोल- कोरेपन्नू - राजपुरा मार्गावरील उज्ज पुलाचे उद्‌घाटन केले.
  3. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 20 जुलै 2019 रोजी डॉ. जितेंद्र सिंह, एमओएस, पीएमओ आणि सीओएएस यांच्या उपस्थितीत जम्मू आणि काश्मीर क्षेत्रातील प्रकल्प संपर्कांतर्गत राजपुरा-मडवळ-पांगदूर-फुलपूर  मार्गावरील बसंत पुलाचे उद्‌घाटन केले.
  4. लेफ्टनंट जनरल हरपालसिंग, एव्हीएसएम, व्हीएसएम, महासंचालक सीमा रस्ते यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी लदाख प्रदेशातील प्रकल्प विजयकांतर्गत निमू-पदम-दर्चा रस्त्यावरील झांस्कर पुलाचे उद्‌घाटन केले.
  5. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 21 ऑक्टोबर 19 रोजी लडाख क्षेत्रातील प्रकल्प हिमांक अंतर्गत डी-एस-डीबीओ रोडवरील कर्नल चेवांग रिन्चेन, एमव्हीसी *,एसएम पुलाचे उद्‌घाटन केले.
  6. 4 नोव्हेंबर 19 रोजी लडाखचे खासदार जामयांग तसेरिंग नामग्याल यांनी लडाख क्षेत्रातील प्रकल्प विजयकांतर्गत झोजिला-कारगिल-लेह मार्गावरील (राष्ट्रीय महामार्ग 1) नूरला पुलाचे उद्‌घाटन केले.
  7. 1 नोव्हेंबर 2019 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेश राज्यातील प्रकल्प ब्राह्मणकांतर्गत रानाघाट- मेबो- डंबुक - बोमजीर (राष्ट्रीय महामार्ग 1) मार्गावरील सिझरी पुलाचे उद्‌घाटन केले.

 

  • पुलाच्या कामांची पूर्तता  खालील पुलांची कामे पूर्ण झाली आहेत:-

 

 

अणु.क्र

पुलाचे नव

रस्ता

विस्तार

राज्य

(a)

सिद्धार

जौलजीबी - मुनस्यारी

40 एम,सिएल -70

उत्तराखंड

(b)

सिराली

जौलजीबी - मुनस्यारी

45 एम, सिएल -70

उत्तराखंड

(c)

भोवलीखलता

 

जौलजीबी - मुनस्यारी

45 एम, सिएल -70

उत्तराखंड

(d)

चारिगड

 

जौलजीबी - मुनस्यारी

85 एम, सिएल -70

उत्तराखंड

(e)

डोंगाटोली

पिथौरागड-तावघाट

30 एम, सिएल -70

उत्तराखंड

(f)

तवांगचु

बालीपारा-चारदूर

50 एम, सिएल - 70

अरुणाचलप्रदेश

(g)

सुखा

औरंग - काळकटंग - शेरगाव - रुपा - टेंगा

45 एम, सिएल – 70

अरुणाचलप्रदेश

(h)

दराज

राजौरी - कांडी - भूधाल

72 एम, सिएल -70

जम्मू आणि काश्मीर

(j)

पुणेजा

बसोली - बाणी - भादेरवाह

50 एम, सिएल -70

जम्मू आणि काश्मीर

(k)

जाडगंगा-I

नेलोंग –नागा

40 मिटर/ सिएल -70 आर,

उत्तराखंड

(l)

पुनार

जोशीमठ - मालारी

35 मिटर / सिएल -70 आर

उत्तराखंड

(m)

करचा - II

भैरोघाटी- नेलोंग

 

 

50 मिटर / सिएल -70 आर

उत्तराखंड

(n)

कुलानागड

पिथौरागड-तवाघाट

 

 

45 मिटर / सिएल -70 आर

उत्तराखंड

(o)

डोबात -I

पिथौरागड-तवाघाट

 

 

40 मिटर / सिएल -70 आर

उत्तराखंड

(p)

खांडपायर

जौलजीबी-मुनस्यारी

 

 

45 मिटर / सिएल -70 आर

उत्तराखंड

(q)

उलेटॉपको
झोजिला-कारगिल-लेह

 

35 मिटर / सिएल -70 आर

जम्मू आणि काश्मीर

 

रस्त्याच्या कामांची पूर्तता  खाली नमुद केलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत:-

  1. जोशीमठ- मलारी - 62.67 कि.मी
  2. नागा - सोनम - 11.20 किमी
  3. मुसापाणी-घास्टोली - 7.40 किमी
  4. ट्राय जंक्शन-भीम बेस-ढोकला – 19.72 किमी
  5. नाचो-तमा चुंग चुंग - 53.55 किमी
  6. गिरिथोबोला - सुमना - 7.05 किमी
  7. ससोमा - ससेर्ला - 52.39 किमी
  8. कोय्युल-फोटोले-चुसुमुले-झुर्सऱ - 80.30 किमी
  9. एनएचडीएल स्पेसिफिकेशनचा दामचू-हा लिंक – 12.80 किमी

 
बायपास रस्ते खुले मार्गावरील बर्फ हटविल्यानंतर खालील महत्वाचे बायपास वाहतुकीसाठी खुले झाले.

 

अणु.क्र.

बायपासचे नाव

वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेली तारीख

(a)

राझधान पास 

6 मे 2019

(b)

झोजीला पास

28 एप्रिल 2019

(c)

रोहतांग पास

19 मे 2019

(d)

बरलाचला पास

  1. un 2019

 

  • भारत-चीन सीमा रस्ते (आयसीबीआर) बीआरओकडे 3346 किलोमीटर लांबीच्या भारत-चीन सीमा रस्त्याची (आयसीबीआर) ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आजपर्यंत 2501 किमी लांबीचे 36 रस्ते पूर्ण झाले आहेत.
  • ब्रम्हपुत्रा नदीतून बोगदा: या कामाला मंत्रालयाने तत्वतः मंजुरी दिली आहे. या प्रस्तावात 2 रोड ट्यूब आणि 1 रेल्वे ट्यूबचा समावेश आहे.

 
राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)

 
  • दुर्गम/एलडब्ल्यूई क्षेत्रात अंतर्भेदन: दुर्गम / एलडब्ल्यूई भाग आणि किनाऱ्यावरील / सीमावर्ती भागात एनसीसी आपले अस्तित्व वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. साधारण नव्याने स्टेपन करण्यात आलेल्या 18 युनिटचे 54,000 कॅडेट या अशा भागात तैनात आहेत.
  • स्वच्छ भारत अभियान: 8 ऑगस्ट ते 27 ऑक्टोबर या कालावधीत 10.5 लाखाहून अधिक कॅडेट्सनी विविध स्वच्छता मोहिमांमध्ये स्वेच्छेने सहभाग घेतला.

 
  1. स्वच्छता अभियान: जानेवारी 2017 पासून, एनसीसी कॅडेट्स स्वच्छता आधारित उपक्रमांशी जोडले आहेत. पंतप्रधानांच्या स्वच्छता ही सेवा (एसएचएस) योजनेचा भाग म्हणून 11 सप्टेंबरपासून 27 ऑक्टोबर पर्यंत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर मुख्य लक्ष केंद्रित करून मेगा स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. यात 9 लाखाहून अधिक कॅडेट्सनी भाग घेतला होता.
  2. मेगा प्रदूषण पंधरवडा: 1 - 31 जुलै दरम्यान एनसीसी, पॅन इंडियाच्या अंदाजे पाचलख कॅडेट्सनी प्रदूषण विरोधी पंधरवडा आयोजित केला होता.
  3. एमओडी स्वच्छता पंधरवडा: 1 ते 15 डिसेंबर दरम्यान 7.5 लाखाहून अधिक कॅडेट्स स्वच्छता पंधरवड्यात सहभागी झाले होते. 07 डिसेंबर रोजी, प्लास्टिक रिमूव्हल थीमवर आधारित, प्लग रन पॅन इंडियामध्ये अंदाजे 4.5 लाख कॅडेट्सनी भाग घेतला होता.
  • जागतिक जल दिन (२२ मार्च): अंदाजे 78,000 एनसीसी कॅडेट्स पॅन इंडिया जलसंधारण मोर्चांमध्ये / कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले.
  • अमली पदार्थ विरोधी आणि बेकायदेशीर तस्करी दिन (26 जून): आमच्या समाज सेवा आणि समुदाय विकास कृती योजनेचा एक भाग म्हणून, सुमारे 95,000 एनसीसी कॅडेट्सनी विविध रॅली आणि जागरूकता कार्यक्रमांमध्ये भाग घेतला.
  • वृक्षारोपण: आगळावेगळा स्वातंत्र्य दिन साजरा करत एनसीसी कॅडेट्सने यंदा अंदाजे 2.2  लाख रोपट्यांची लागवड केली आहे.
  • आंतरराष्ट्रीय योग दिन: मागील वर्षीची आपली परंपरा कायम ठेवत यावर्षीही 21 जून रोजी 400वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 3.38 लाख कॅडेट्सनी या कार्यक्रमात भाग घेतला.
  • आपत्ती मदतकार्य: बिहार, केरळ आणि महाराष्ट्रातील पूर आणि ओडिशामधील चक्रीवादळामुळे होणार्‍या नुकसानीदरम्यान नागरी प्रशासनाला मदतकार्य करण्यासाठी एनसीसी कॅडेट सक्रियपणे सहभागी होते.
M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar

 

 

(Release ID: 1599073) Visitor Counter : 1087


Read this release in: English