आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
ओदिशा सरकारच्या दोन सार्वजनिक उपक्रमांसह गठित निलांचल इस्पात निगम लिमिटेडमधल्या मिनरल्स ॲन्ड मेटल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, मेकॉन आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच्या भाग भांडवल धोरणात्मक निर्गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वत: मान्यता
Posted On:
08 JAN 2020 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने निलांचल इस्पात निगम लिमिटेडमधल्या मिनरल्स ॲन्ड मेटल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (49.78 टक्के), नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन(10.10 टक्के), मेकॉन (0.68 टक्के) आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स (0.68 टक्के) आणि ओदिशा सरकारचे दोन सार्वजनिक उपक्रम, इंडस्ट्रीयल प्रमोशन ॲन्ड इनव्हेसमेंट कॉर्पोरेशन ऑफ ओदिशा लिमिटेड (12 टक्के) आणि ओदिशा मायनिंग कॉर्पोरेशन (20.47) टक्के भाग भांडवलाच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीला तत्वत: मान्यता दिली आहे.
या निर्गुंतवणुकीमुळे निलांचल इस्पात मधली संसाधन मुक्त होऊन सामाजिक क्षेत्र आणि विकास कामांसाठी त्यांचा उपयोग करता येईल.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1598816)
Visitor Counter : 177