मंत्रिमंडळ

भारत आणि फ्रान्स दरम्यान स्थलांतर आणि दळणवळण भागीदारी कराराला मंजुरी

Posted On: 08 JAN 2020 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2020

 

भारत आणि फ्रान्स दरम्यान स्थलांतर आणि दळणवळण भागीदारी कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. मार्च 2018 मधे फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.

दोन्ही देशांमधील नागरिकांचा परस्पर संपर्क, विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक आणि कुशल व्यावसायिक यांच्या दळणवळणात वाढ होण्यासाठी तसेच बेकायदेशीर स्थलांतर आणि मानवी तस्करी रोखण्यासाठी उभय देशांच्या सहकार्य मजबूत करण्यासाठी हा करार महत्वपूर्ण आहे.

सुरुवातीला हा करार सात वर्षांसाठी वैध आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 



(Release ID: 1598801) Visitor Counter : 148


Read this release in: English