मंत्रिमंडळ

गुजरात आयुर्वेद विद्यापीठ कॅम्पस, जामनगर येथील आयुर्वेद संस्थांच्या संकुलाला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 08 JAN 2020 4:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरात आयुर्वेद विद्यापीठ कॅम्पस, जामनगर येथील आयुर्वेद संस्थानच्या संकुलाला एकत्रित करून जामनगरमधील शिक्षण आणि संशोधन संस्थेला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये, (ए) आयुर्वेदातील पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन संस्था (बी) गुलाबकुंवरबा आयुर्वेद महाविद्यालय आणि (सी) फार्मसी युनिटसह आयुर्वेद फार्मास्युटिकल विज्ञान संस्था आणि योगासने आणि निसर्गोपचार शिक्षण आणि संशोधन शिक्षण मंडळाच्या महर्षी पतंजली संस्था तसेच आयुर्वेदातील शिक्षण आणि संशोधन संस्थांचे विभाग यांचा समावेश आहे.

जामनगर येथील आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्थांना राष्ट्रीय संस्था म्हणून घोषित करण्यासाठी संसदेच्या पुढील अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार आहे.

भारतासमोरील सार्वजनिक आरोग्याच्या आव्हानांवर उपाय म्हणून आयुष प्रणालीची वेगाने वाढणारी भूमिका लक्षात घेता, या संस्थांना राष्ट्रीय महत्त्व प्रदान केल्याने सार्वजनिक आरोग्यामध्ये आयुर्वेदाची भूमिका आणि महत्त्व वाढेल.

जगभरातून आयुर्वेदाच्या ज्ञानाची आणि सेवांची मागणी वाढत आहे. आयुर्वेदाचे मूळ भारतात आहे आणि आयुर्वेदात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान करणाऱ्या अत्याधुनिक संस्था भारतात स्थापन होतील याकडे संपूर्ण जग लक्ष देऊन आहे. प्रस्तावित संस्थेला राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्यानतर आयुर्वेद शिक्षणाचे प्रमाण वाढेल, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मागणीनुसार आयुर्वेदात विविध अभ्यासक्रमांची रचना केली जाईल, प्रगत मूल्यांकन पद्धती अवलंबणे इत्यादींना स्वायत्तता मिळेल.

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

 

 



(Release ID: 1598755) Visitor Counter : 104


Read this release in: English