संरक्षण मंत्रालय

सोमालीया किनाऱ्याजवळ अडकलेल्या जहाजाला आयएनएस सुमेधाकडून सहाय्य

प्रविष्टि तिथि: 08 JAN 2020 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2020

 

एडनच्या आखातात, चाचेगिरीविरोधात गस्त घालणाऱ्या भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमेधा या जहाजाने संकटात असलेल्या अल-हमीद या जहाजाला मदत केली. लाकडाचे हे पारंपारिक जहाज धावम्हणून ओळखले जाते. आयएनएस सुमेधावरुन झेप घेतलेल्या आयएन हेलिकॉप्टरला अल हमीद हे जहाज, सोमालियाच्या किनाऱ्याजवळ संकटात असल्याचे आढळून आले. त्यावेळी आयएनएस सुमेधाच्या नौदल तंत्र पथकाने, अल-हमीद जहाजाला मदत पुरवली. भारतीय नौदलाच्या गस्त घालणाऱ्या नौकेने, संकटात अडकलेल्या या जहाजाच्या कर्मचाऱ्यांना पाणी आणि वैद्यकीय मदतही पुरवली. या जहाजाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आणि त्याची दुरुस्ती समुद्रात शक्य नसल्याने या त्वरित कृती करण्यात आल्यात.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1598752) आगंतुक पटल : 140
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English