Posted On:
05 JAN 2020 7:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2020
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर 7 जानेवारी 2020 रोजी नवी दिल्ली येथे पहिला 'आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान' प्रदान करतील.
देश-विदेशात योग प्रचार-प्रसारामध्ये भरीव कामगिरी केलेल्या माध्यमांच्या सकारात्मक व जबाबदारीपूर्ण भूमिकेची नोंद म्हणून माहिती व प्रसारण मंत्रालयाने 'आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्माना'चे नियोजन जून 2019 मध्ये केले आहे.
सदर सन्मान खालील विभागात केले जाणार आहेत:
- हे 30 सन्मान 3 विभागात विभागलेले आहेत.
- 11 सन्मान 'योगाला बातमीदारीत सर्वोत्कृष्ठ स्थान देणारे वर्तमानपत्र' या विभागात दिले जातील.
- 8 सन्मान 'योगाला बातमीदारीत सर्वोत्कृष्ठ स्थान देणारी वृत्तवाहिनी' या विभागात दिले जातील.
- 11 सन्मान 'योगाला बातमीदारीत सर्वोत्कृष्ठ स्थान देणारी रेडिओ वाहिनी' या विभागात दिले जातील.
पदक, पट्टिका, चषक व प्रशस्तिपत्रक असे या सन्मानाचे स्वरूप असेल. मंत्रालयाला प्राप्त झालेल्या प्रवेशिकांचे परीक्षण सहा सदस्यांच्या परीक्षक मंडळाकडून होईल, ज्याचे प्रतिनिधित्व 'प्रेस कॉन्सिल ऑफ इंडिया'चे अध्यक्ष सी. के. प्रसाद करतील.
S.Nilkanth/D.Rane