अवजड उद्योग मंत्रालय

फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 2636 ईव्ही चार्जिंग केंद्रांना मंजूरी

Posted On: 03 JAN 2020 6:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जानेवारी 2020

 

रस्ते वाहतूक क्षेत्रात स्वच्छ इंधनाला चालना देण्याच्या उद्देशाने अवजड उद्योग विभागाने फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 62 शहरांमध्ये 2636 ईव्ही चार्जिंग केंद्रांना मंजुरी दिली आहे. यातील 1633 फास्ट चार्जिंग स्टेशन असतील, तर 1003 स्लो चार्जिंग स्टेशन असतील.

महाराष्ट्रात 317, आंध्र प्रदेशात 266, तामिळनाडूत 256, गुजरातमध्ये 228, राजस्थानमध्ये 205, उत्तर प्रदेशात 207, कर्नाटकात 172, मध्य प्रदेशात 159, पश्चिम बंगालमध्ये 141, तेलंगणमध्ये 138, केरळमध्ये 131, दिल्लीत 72, चंदिगडमध्ये 70, हरियाणामध्ये 50, मेघालयमध्ये 40, बिहारमध्ये 37, सिक्कीममध्ये 29, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी 25, आसाममध्ये 20, ओदिशामध्ये 18, तर उत्तराखंड, पुद्दुचेरी आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी 10 ईव्ही चार्जिंग केंद्रांचे वितरण करण्यात आले आहे.

चार्जिंग केंद्रांसाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर तसेच आवश्यक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने निवडक राज्यांना मंजुरीपत्र जारी केली जातील.

अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, भविष्यात बहुतांश निवडक शहरांमध्ये किमान एक चार्जिंग केंद्र उपलब्ध असेल. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणाऱ्यांचा विश्वास वाढेल आणि ओईएम’ला नवीन इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळेल.

 

 

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

 



(Release ID: 1598422) Visitor Counter : 191


Read this release in: English