अर्थ मंत्रालय
डिसेंबर 2019 मध्ये 1,03,184 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलित
Posted On:
01 JAN 2020 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2020
डिसेंबर 2019 मध्ये 1,03,184 कोटी रुपये इतका स्थूल जीएसटी महसूल संकलित करण्यात आला. यामध्ये 19,962 कोटी रुपये सीजीएसटी, 26,792 कोटी रुपये एसजीएसटी, 48,099 कोटी रुपये आयजीएसटी आणि 8,331 कोटी रुपये उपकर समाविष्ट आहे. नोव्हेंबर महिन्यासाठी 31 डिसेंबर 2019 पर्यंत 81.21 लाख जीएसटीआर 3 बी विवरणपत्रे दाखल करण्यात आली.
सरकारने नियमित भरपाई स्वरुपात आयजीएसटीमधून सीजीएसटीसाठी 21,814 कोटी रुपये, तर एसजीएसटीसाठी 15,366 कोटी रुपये दिले. ही भरपाई दिल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळवलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी 41,776 कोटी रपये, तर एसजीएसटीसाठी 42,158 कोटी रुपये इतका आहे.
S.Tupe/S.Kane/D.Rane
(Release ID: 1598197)
Visitor Counter : 247