संरक्षण मंत्रालय
देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल बिपीन रावत यांनी पदभार स्वीकारला
सशस्त्र दलांमध्ये अधिक समन्वय निर्माण करणार
प्रविष्टि तिथि:
01 JAN 2020 6:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2020
जनरल बिपिन रावत यांनी आज संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. तिन्ही सेवादलांसाठी संरक्षण मंत्र्यांचे ते प्रमुख लष्करी सल्लागार असतील. लष्करी कामकाज विभागाचे प्रमुख म्हणूनही ते काम पाहतील. उपलब्ध स्रोतांचा योग्य वापर, संयुक्त नियोजन आणि एकात्मिकरणाच्या माध्यमातून सेवादलांसाठी खरेदी, प्रशिक्षण आणि परिचालनात अधिक समन्वय राखण्यात संरक्षण दल प्रमुखांची महत्वपूर्ण भूमिका राहील.
माध्यमांशी संवाद साधताना जनरल रावत म्हणाले की, लष्कर, नौदल आणि हवाईदल एक टीम म्हणून काम करतील. तत्पूर्वी त्यांना तिन्ही सेवादलांकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी नौदल प्रमुख ॲडमिरल करमबीर सिंग, हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदौरिया आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे उपस्थित होते. जनरल रावत यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे शहीदांना श्रद्घांजली वाहिली.
S.Tupe/S.Kane/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1598195)
आगंतुक पटल : 259
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English