माहिती आणि प्रसारण मंत्रालय
2019 वर्ष आढावा: माहिती प्रसारण मंत्रालय
Posted On:
27 DEC 2019 6:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2019
माहिती प्रसारण मंत्रालय हे एक महत्वाचे मंत्रालय मानले जात असते सरकारची धोरणे, योजना आणि कार्यक्रम विविध माध्यमातून जनतेपर्यत पोहोचवण्याची महत्वाची जबाबदारी हे मंत्रालय पार पाडत असते. वर्ष 2019 मध्ये या मंत्रालयाने जनतेपर्यंत सुलभतेने, पारदर्शकतेने आणि अचूक माहिती पोहचवण्यासाठी विविध उपक्रम राबवले. या वर्षात सरकारने जी कामे केलीत, निर्णय घेतले ते सर्व निर्णय आणि कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यात आली.
माहिती विभाग
जागतिक पुस्तक मेळा,नवी दिल्ली, 5 ते 13 जानेवारी, 2019. या पुस्तक मेळ्यात, "मुलांसाठीचे साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक साधनांच्या जाळ्यात अडकलेले युवा वाचक' या विषयावर परिक्षण विभागातर्फे एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रकाशन विभागातर्फे दहा पुस्तकेही प्रकाशित करण्यात आली- सरल पंचतंत्र-भाग 1, मुलांचे विवेकानंद, मुलांसाठीचे महाभारत (इंग्रजी), शेखावती की लोक संस्कृती, हमारे समय मी उपनिषद, हार की खुशी, माँ का जनमदिन, बापू की वाणी, वेड गाथा आणि बाल महाभारत (हिंदी) ·
लंडन पुस्तक मेळ्यात भारताचा स्टॉल : इंडिया पॅव्हिलियन - 12 ते 14 मार्च, 2019.
लंडन पुस्तक मेळ्यात इंडिया पॅव्हेलियन मध्ये महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती वर्षावर भर देण्यात आला होता. यावेळी महात्मा गांधी यांच्या साहित्याची डिजिटल आवृत्ती विक्रीस ठेवण्यात आली होती. त्याशिवाय, भारतीय संस्कृती, इतिहास आणि लोककथांचे संग्रह देखील यावेळी ठेवण्यात आले होते.
-- संदर्भ ग्रंथ- प्रकाशन विभागाची दोन महत्वाची प्रकाशने, ‘भारत 2019’ आणि ‘इंडिया 2019’ देखील प्रकाशित करण्यात आले-
--छायाचित्र प्रदर्शन- अमृतसर येथे झालेल्या जालियाँवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंत्रालयाच्या प्रादेशिक जनसंपर्क विभाग (आऊटरिच ब्युरो) ने एप्रिल 2019,मध्ये स्वातंत्र्यलढ्यावर विशेष छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले होते.
-- प्रकाशन विभागाच्या अनेक ई-प्रकल्पांचे यावेळी उदघाटन करण्यात आले, यात त्यांच्या आधुनिक संकेतस्थळाचे उदघाटन, डिजिटल DPD या मोबाईल अँप चे उदघाटन, रोजगार समाचारच्या ई आवृत्तीचे प्रकाशन, आणि सत्याग्रह गीता या ई बुकचे प्रकाशन.
-- रोजगार समाचारची ई-आवृत्ती प्रकाशित- इच्छुकांना सरकारी क्षेत्र आणि सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील रोजगाराच्या संधीविषयीची माहिती कळावी, या हेतूने प्रकाशन.
--जलदूत - प्रादेशिक जनसंपर्क विभाग, पुणे च्या वतीने जलशक्ती अभियानावर 'जलदूत' हे फिरते अभियान आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांची तसेच सरकारी योजना आणि उपक्रमांची माहिती विविध पॅनेल्स आणि दृक- श्राव्य माध्यमातून देण्यात आली होती.
--'लोकतंत्र के स्वार' आणि ' द रिपब्लिकन एथिक्स' यांच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन - प्रकाशन विभागाच्या संचालनालयाने संग्रहित केलेल्या, भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडक भाषणांचे संकलन असलेल्या पुस्तकाची हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती प्रकाशित.
प्रसारण विभाग
दूरदर्शनवर विशेष प्रवासवर्णनपर कार्यक्रम “रग रग में गंगा” आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा “मेरी गंगा’ असे दोन कार्यक्रम सुरु करण्यात आले. दूरदर्शन आणि राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियान यांनी संयुक्तपणे ‘रग रग मे गंगा’ हा विशेष कार्यक्रम तयार केला होता. या कार्यक्रमातून गंगा नदी पुनरुज्जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांना गंगा स्वच्छतेचा संदेश दिला, त्याशिवाय गंगा स्वच्छतेसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती अत्यंत रोचक पद्धतीने देण्यात आली. ‘मेरी गंगा’ ही प्रश्नमंजुषा स्पर्धा देखील दूरदर्शन आणि राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियान यांनी तयार केला. या कार्यक्रमाअंतर्गत देशातल्या वेगवेगळ्या विभागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना गंगा नदीविषयी माहिती मिळावी आणि त्यांच्यातले कुतूहल जागृत होऊन गंगा स्वच्छतेविषयी आत्मीयता वाटावी या हेतूने हा कार्यक्रम करण्यात आला होता.
-- खाजगी एफएम रेडीओ वाहिन्यांना आकाशवाणीची बातमीपत्रे सहक्षेपित करण्याची परवानगी- आकाशवाणीची इंग्रजी आणि हिंदी भाषेतील बातमीपत्रे काही अटी आणि शर्तीसह खाजगी वाहिनीवरून सहक्षेपित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
--पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 फेब्रुवारी 2019 रोजी दूरदर्शनच्या ‘अरुणप्रभा’ या नव्या उपग्रह वाहिनीचे उद्घाटन झाले. ही 24x7 वाहिनी अरुणाचल प्रदेशाला समर्पित असेल.
-दूरदर्शनच्या मोफत डीशच्या मार्फत 11 प्रादेशिक वाहिन्या अपग्रह वाहिन्यांच्या कक्षेत आणल्या गेल्या. दूरदर्शनच्या मोफत डीशमुळे पहिल्यांदाच छत्तीसगड, गोवा, हरयाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यांची स्वतःची वाहिनी उपग्रह नेटवर्क वर येऊ शकली.
दूरदर्शनच्या मोफत डीश आणि सेट टॉप बॉक्सचे जम्मू-कश्मीरमध्ये वितरण—
डोगरी या काश्मिरी भाषेतील अर्ध्या तासाच्य विशेष कार्यक्रमाच्या शुभारंभासह DD काश्मीर वाहिनीवरुन एक बातमीपत्र देखील सुरु करण्यात आले, शिवाय वाहिनीची स्वतःची धून देखील तयार करण्यात आली. सीमेवरच्या लोकांपर्यत सार्वजनिक प्रसारमाध्यमे पोहोचवून त्यांच्यामार्फत माहिती, जनजागृती आणि मनोरंजन करण्यासाठी उचललेले पाऊल.
देशातील प्रत्येक जिल्ह्यात कम्युनिटी रेडीओ स्टेशन सुरु करण्याचा मंत्रालयाचा मानस आहे- ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या सातव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडीओ संमेलनात घोषणा केल्यानुसार,प्रत्येक जिल्ह्यात कम्युनिटी रेडीओ स्टेशन सुरु केल्यास, या माध्यमातून तळागाळापर्यत अधिक प्रभावीपणे माहिती पोहोचवता येईल, जेणेकरून गावातील जनता अधिक सक्षम होईल.
· दिव्यांग व्यक्तींना समजेल अशा भाषेत वाहिन्यांवर कार्यक्रम दाखवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी -
या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनापासून खाजगी उपग्रह वाहिन्यांनी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करताना ते दिव्यांग-विशेषतः मूकबधीरांना समजेल अशा चिन्हांच्या भाषेतही करण्यात आले. ही एक महत्वाची सुरुवात होती.
स्वातंत्र्यदिनानिमित्त दूरदर्शनकडून ‘वतन’ या देशभक्तीपर गीताची निर्मिती आणि प्रसारण करण्यात आले- हे गीत नव्या भारताची थोरवी सांगणारे आहे. सरकारने केलेल्या अनेक महत्वपूर्ण निर्णय आणि उपक्रमांची माहिती या गीतात सांगितली आहे, विशेषतः चांद्रयान 2 च्या यशस्वी मोहिमेमागचे प्रयत्न आणि निश्चय या गीतात अधोरेखीत करण्यात आला आहे. त्यासोबत या गीतातसैनिकांचे शौर्य आणि पराक्रमाला वंदन करण्यात आले आहे तसेच लष्करी सेवेत शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
चित्रपट विभाग :
रांची येथे दुसऱ्या झारखंड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे-
झारखंड येथे 1 ते 3 फेब्रुवारी 2019 दरम्यान झारखंड येथे झालेल्या दुसऱ्या झारखंड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. झारखंड येथे चित्रपट निर्मितीसाठी असलेल्या पोषक वातावरणाला प्रोत्साहन देणे हा या आयोजनामागचा उद्देश होता.
चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून भारतीय पैनोरामा चित्रपट महोत्सवाचे नवी दिल्लीत आयोजन :
अशा चित्रपट महोत्सवांमुळे प्रेक्षकांना भाषेची बंधने ओलांडून देशातील सर्व प्रान्तातली संस्कृती आणि चालीरीती समजून घेण्यासाठी मदत होते. यातून विविध शहरात राहणाऱ्या लोकांचा परस्परांशी संवाद आणि संपर्क वाढतो.
69व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पेव्हेलीयन: या महोत्सवानिमित्त मिळालेल्या व्यासपीठावरून भारतीय चित्रपट लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला गेला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट उद्योगासाठी नव्या संधी देखील उपलब्ध झाल्या.
अबू धाबी आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात भारतीय पेव्हेलीयन:- अबू धाबी येथे झालेल्या पुस्तक मेळ्यात भारताला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. 24 ते 30 एप्रिल 2019 या कालावधीत हा पुस्तक मेळा भरवण्यात आला होता
कान चित्रपट महोत्सव 2019 मध्ये इंडीयन पेव्हेलीयनचे आयोजन: - या प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटातील भाषिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक विविधतेचे दर्शन घडवणे जेणेकरुन भारतीय चित्रपट सृष्टीसाठी निर्मिती, वितरण, भारतात चित्रीकरण, पटकथा लेखन, तंत्रज्ञान आणि चित्रपट प्रसिद्धीसाठी आंतरराष्ट्रीय भागीदारी मिळू शकेल. टोरांटो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील (सप्टेंबर 2019)इंडियन पेव्हेलीयन आयोजित करण्यात आले होते.
गोव्यात 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फीचे आयोजन :- यंदाच्या या विशेष सुवर्णमहोत्सवी वर्षात रशियाला खास स्थान देण्यात आले होते. ज्येष्ठ चित्रपट अभिनेते सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि भारतीय चित्रपट सृष्टीचे ‘थलैवा’, रजनीकांत यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ झाला. यावेळी रजनीकांत यांना चित्रपट सृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल “आयकॉन ऑफ द गोल्डन ज्युबिली अवार्ड”ने सन्मानित करण्यात आले. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हा विशेष पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. फ्रेंच चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री इझाबेल हुप्पर्त यांना या महोत्सवात जीवनगौरव पुस्काराने सन्मानित करण्यात आले. गोरेन पास्कलजेविक यांनी दिग्दर्शित केलेल्या “डीस्पाईट द फॉग” या चित्रपटाने हा महोत्सवाचा शुभारंभ झाला. ब्लेझ हैरीसन यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि इस्टेल फियालोन यांनी निर्मित केलेल्या पार्टीकल्स” या चित्रपटाला यंदाच्या सुवर्णमयूर पुरस्कार मिळाला. लीझो जोस पेलीस्सरी यांना जालिकत्टू पुरस्कार देण्यात आला. सेऊ जॉर्ज यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि उषा जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण: - उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते नवी दिल्लीत 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, माहिती प्रसारण सचिव रवी मित्तल यावेळी उपस्थित होते. यावेळी, ‘हालेरोईन’ या गुजराती चित्रपटाला सर्वोत्कुष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. तर, ‘बधाई हो’ या चित्रपटाला सर्वोत्कुष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. पैडमैन चित्रपटाला सामाजिक विषयावरील सर्वोत्कुष्ट चित्रपट, आदित्य धर यांना ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटासाठी सर्वोत्कुष्ट दिग्दर्शक, आयुष्यमान खुराना आणि विकी कौशल यांना अंधाधून आणि ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटांतील अभिनयासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्यांचा पुरस्कार विभागून देण्यात आला. कीर्ती सुरेश यांना तेलगु चित्रपट महानाती साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. मराठी चित्रपट ‘नाळ’ ला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा इंदिरा गांधी पुरस्कार देण्यात आला. तर आणखी एक मराठी चित्रपट ‘पाणी’ ला पर्यावरण संवर्धन विषयातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवण्यात आले. राष्ट्रीय एकात्मतेवरील चित्रपटांसाठीचा नर्गिस दत्त पुरस्कार कन्नड चित्रपट “ओंडाला एराडाला’ या चित्रपटाला मिळाला. तर, उत्तराखंड राज्याला चित्रपट निर्मितीसाठीचे सर्वात उत्तम राज्य म्हणून गौरवण्यात आले.
त्याशिवाय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या सर्व प्रसारमाध्यमांची पहिलीच वार्षिक परिषद देखील यावर्षी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत, या प्रसारमाध्यमांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. मंत्रालयाच्या अखत्यारीतील सर्व प्रसारमाध्यमांच्या दैनंदिन कामकाजात सुसूत्रता यावी, यावर या परिषदेत भर देण्यात आला. त्याशिवाय, संवाद आणि संपर्क यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर देखील या परिषदेत चर्चा करण्यात आली.
N.Sapre/R.Aghor/D.Rane
(Release ID: 1598154)
Visitor Counter : 171