रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

फास्टॅगच्या विक्रीला चालना, दैनंदिन वापरातही उल्लेखनीय वाढ

Posted On: 31 DEC 2019 6:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2019

 

यावर्षी 15 डिसेंबरपासून फास्टॅगच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक टोल स्वीकारण्याची अंमलबजावणी केल्यामुळे फास्टॅगच्या विक्रीला चालना मिळाली आहे. सुमारे 1.15 कोटी फास्टॅग यापूर्वी जारी केले आहेत, तर 1 लाखांहून अधिक फास्टॅग दरदिवशी दिले जात आहेत.

फास्टॅगमुळे राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर वाहन चालकांना थांबावं लागणार नाही. टोलची रक्कम टॅगशी जोडलेल्या प्री-पेड अकाऊंट अथवा बँक अकाऊंटमधून कापली जाईल. फास्टॅग रिचार्ज करणे सोपे व्हावे, यासाठी भारत सरकारने नुकतचे रिचार्ज करण्याच्या पर्यायांमध्ये भीम ॲपच्या पर्यायाचाही समावेश केला आहे. त्यामुळे प्रवाशांना सुखकर प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. फास्टॅगच्या माध्यमातून 30 लाख वाहनांची ये-जा झाल्यामुळे सुमोर 52 कोटी रुपये इतका टोल जमा झाला आहे.

राष्ट्रीय महामार्गवर सुरक्षित, सुखकर आणि सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्याच्या दिशेने फास्टॅग हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे.

 

 

 

S.Tupe/D.Rane

 

 



(Release ID: 1598083) Visitor Counter : 103


Read this release in: English