उपराष्ट्रपती कार्यालय

जाती आणि वर्ग विरहित समाजाच्या निर्मितीसाठी उपराष्ट्रपतींचे आवाहन

Posted On: 30 DEC 2019 5:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2019

 

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज जाती आणि वर्ग विरहित समाज निर्मितीचे आवाहन केले. एक देश म्हणून आपण प्रत्येक व्यक्तीला पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्याची आणि समाधानी आयुष्य व्यतित करण्याची समान संधी उपलब्ध करुन देण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केले.

केरळ मधल्या वरकला इथल्या सिवगिरी मठात 87व्या सिवगिरी यात्रा संमेलनाचे उद्‌घाटन करतांना उपराष्ट्रपती बोलत होते.

सर्व धर्मांचे गुरु, मौलवी, बिराप आणि इतर धार्मिक नेत्यांनी सर्व भेदभाव विशेषत: जातीच्या नांवावर होणाऱ्या भेदभावांचे उच्चाटन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, असे आवाहन नायडू यांनी केले. श्री नारायण गुरुंसारख्या महान संतांकडून प्रेरणा घेऊन धर्मगुरुंनी कार्य करावे, असंही त्यांनी सांगितले.

 

 

 

S.Tupe/J.Patankar/D.Rane

 

 


(Release ID: 1597989)
Read this release in: English