अर्थ मंत्रालय

महसूल गुप्तचर संचालनालयाचे देश संरक्षणासाठीचे योगदान अधोरेखित करण्यासाठी अर्थमंत्र्यांच्या हस्ते विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

Posted On: 26 DEC 2019 5:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2019

 

केंद्रीय अर्थ आणि व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारितील महसूल गुप्तचर संचालनालयाने देश संरक्षणासाठी दिलेले योगदान अधोरेखित करण्यासाठी हे विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे. या संचालनालयाच्या आजवरच्या योगदानासाठी अर्थमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले. देशातील तस्करी विरोधात कारवाया आणि देशाचा सांस्कृतिक वारसा व पर्यावरण संपत्तीचे रक्षण करणे यात विभागाची भूमिका महत्वाची आहे असे त्या म्हणाल्या. तस्करीसाठी आज जी विविध आधुनिक साधने वापरली जातात त्यामुळे या संस्थेसमोरची आव्हाने वाढली आहेत. ही आधुनिक साधनं आणि तंत्रज्ञानाचा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची अत्यंत गरज आहे असे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाला वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह वित्त आणि महसूल विभागाचे महसूल अधिकारी उपस्थित होते.  

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 



(Release ID: 1597717) Visitor Counter : 105


Read this release in: English