Posted On:
24 DEC 2019 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2019
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “नाताळच्या आनंददायी प्रसंगी, मी भारत आणि परदेशातील माझ्या सर्व नागरिकांना, विशेषत: माझ्या ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा देतो.
येशू ख्रिस्तांचा जन्म हा मानवतेसाठी प्रेरणादायक आहे. येशू ख्रिस्तांचे जीवन आपल्याला प्रेम, करुणा आणि बंधुभावाचा संदेश देते. आज जेव्हा समाजाला संघर्ष, कटुता आणि हिंसेच्या समस्येने ग्रासले आहे. येशुंच्या विचारांमध्ये या समस्येचे निराकरण करण्याची आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याची शक्ती आहे. आपण येशूंनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करूया आणि दयाळू आणि समतावादी समाज निर्माण करूया”.
S.Tupe/P.Malandkar