संरक्षण मंत्रालय

‘पिनाक’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Posted On: 20 DEC 2019 5:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2019

 

डीआरडीओ म्हणजेच संरक्षण, संशोधन आणि विकास संघटनेने आज ओदिशातल्या चंडीपूर येथे सकाळी 11 वाजता ‘पिनाक’ या क्षेपणास्त्राची दुसरी यशस्वी चाचणी घेतली. काल 75 किलोमीटर्सच्या टप्प्यापर्यंत या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी घेण्यात आली होती. तर आज 20 किलोमीटर्सच्या टप्प्यापर्यंतच्या लक्ष्यावर 60 सेकंदाच्या अंतराने दोनदा चाचणी करण्यात आली.

 

‘पिनाक एम के-II’ रॉकेट हे दिशादर्शक आणि नियंत्रण तसेच मार्गदर्शक व्यवस्थेने युक्त असलेले क्षेपणास्त्र आहे. अचूक लक्ष्यभेद तसेच माऱ्याचा टप्पा वाढवण्यासाठी यात सुधारणा करण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राला आयआरएनएसएस या दिशादर्शक उपग्रह प्रणालीशी जोडले असून, त्याद्वारे त्याला मार्गदर्शन मिळू शकेल.

आज झालेल्या चाचणीत ‘पिनाक’ने सर्व कसोट्या यशस्वीपणे पार पाडल्या.

 

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

 



(Release ID: 1597097) Visitor Counter : 305


Read this release in: English