वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
रत्न आणि जवाहिरे क्षेत्रात मोठी क्षमता; 75 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे उद्दिष्ट वेगाने साध्य करणार- पियुष गोयल
Posted On:
20 DEC 2019 5:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2019
भारतीय रत्न आणि जवाहिरे क्षेत्र हे दागिन्यांचे जागतिक केंद्र आहे आणि देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात त्याचा वाटा 7 टक्के इतका आहे. या क्षेत्रात करण्यात येत असलेल्या कामांची प्रशंसा करतांना केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या क्षेत्रातल्यांना सध्याच्या 40 अब्ज डॉलर्सच्या उद्दिष्टांवरुन 75 अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट जलदगतीने गाठण्याचे आवाहन केले. नवी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या 46व्या भारतीय रत्न आणि जवाहिरे पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
व्यापार वाढवण्याची आणि रोजगार निर्मितीची क्षमता भारतीय रत्न आणि जवाहिरे क्षेत्रात असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी नमूद केले. 75 अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मंत्रालय शक्य ती सर्व मदत करेल, असे आवाहन त्यांनी केले.
ECGCची NIRVIK ही नवीन योजना लवकरच सुरु होणार असून, जवाहिरे क्षेत्रातल्या उद्योजकांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा. यामुळे कर्ज पुरवठ्याची प्रक्रिया सोपी होईल आणि निर्यातदारांसाठी कर्ज उपलब्धता वाढेल, असे गोयल म्हणाले. यामुळे केवळ मोठ्या निर्यातदारांनाच नव्हे तर छोट्या निर्यातदारांनाही स्वस्त दरात परकीय चलन कर्ज उपलब्ध होईल.
B.Gokhale/S.Kane/D.Rane
(Release ID: 1597082)
Visitor Counter : 93