आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्र सरकारची आरोग्य केंद्रे लवकरच 100 शहरांमध्ये स्थापन केली जातील: डॉ. हर्षवर्धन

Posted On: 19 DEC 2019 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2019

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत केंद्र सरकारच्या आरोग्य केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले.सध्या या आरोग्य केंद्रांची योजना 72 शहरांमध्ये कार्यरत आहे. लवकरच 100 शहरांपर्यंत ही सेवा वाढवली जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. सध्या याअंतर्गत 239 ॲलोपॅथी उपचार केंद्रे आणि 86 आयुष केंद्रे आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून 12 लाखांपेक्षा अधिक कार्डधारकांना आणि 35 लाख लाभार्थ्यांना उपचार दिले जातात, असे त्यांनी सांगितले.

2014 नंतर 72 शहरांमध्ये अशी केंद्रे स्थापन करण्यात आली. तसेच इतर सर्व आरोग्य सेवाही वाढवण्यात आल्या, असे त्यांनी सांगितले. ‘इट राइट इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ या दोन मोहिमांच्या माध्यमातून सरकार प्रतिबंधात्मक आणि सकारात्मक आरोग्य व्यवस्थेवर भर देत आहेत, असेही ते म्हणाले.

 

 

 

B.Gokhale/R.Aghor/D.Rane


(Release ID: 1596992) Visitor Counter : 94


Read this release in: English