आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि महिला बाल कल्याण मंत्रालयातर्फे पोषण महिला तसेच बाल आरोग्य वृद्धीसाठी एकत्रित लक्ष्य
Posted On:
17 DEC 2019 5:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2019
पोषण तसेच महिला आणि बाल आरोग्य क्षेत्रात वृद्धी करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि महिला बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी एकत्रित लक्ष्य निश्चित केले आहे.
वैश्विक आरोग्य कवचासाठी आम्ही कटीबद्ध असून प्रत्येक माता, प्रत्येक बालक आणि प्रत्येक युवा यांच्या आरोग्यात वृद्धी व्हावी हे आमचे लक्ष्य आहे, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.
पोषण, महिला तसेच बाल आरोग्य वृद्धीबाबत समान कार्यक्रम विकसित करण्यावर आणि संयुक्त मोहीमा हाती घेण्यात दोन्ही मंत्र्यांचे एकमत झाल्याचे ते म्हणाले.
स्टेम क्षेत्रात महिलांना प्राधान्य मिळावे यासाठी राष्ट्रीय पातळीवर दहा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे सहाय्य करण्यात येईल, असे स्मृती इराणी म्हणाल्या.
S.Tupe/J.Patankar/P.Kor
(Release ID: 1596741)
अभ्यागत कक्ष : 114