वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
नोव्हेंबर 2019 मधील घाऊक किंमत निर्देशांक
Posted On:
16 DEC 2019 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,16डिसेंबर2019
नोव्हेंबर 2019 मध्ये घाऊक किंमत निर्देशांकात 0.10 टक्के वाढ होऊन तो 122.3 (तात्पुरती आकडेवारी) झाला. त्या आधीच्या महिन्यात तो 122.2 (तात्पुरती आकडेवारी) होता.
चलनफुगवटा
मासिक घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा वार्षिक दर नोव्हेंबर 2019 मध्ये 0.58 टक्के (तात्पुरती आकडेवारी) झाला. ऑक्टोबर 2019 मध्ये तो 0.16 टक्के (तात्पुरती आकडेवारी) होता. गेल्या वर्षी याच कालावधीत तो 4.47 टक्के होता.
प्राथमिक वस्तू
या गटाच्या निर्देशांकात 0.9 टक्के वाढ होऊन तो 147.3 (तात्पुरती आकडेवारी) वर पोहोचला. त्या आधीच्या महिन्यात तो 146.0 होता.
खाद्य गटाचा निर्देशांक 1.4 टक्क्याने वाढून 162.4 टक्के झाला. या आधीच्या महिन्यात तो 160.2 होता. उडीद (19 टक्के), समुद्रातील मासे (6 टक्के), मूग (5 टक्के), राजमा (4 टक्के), ज्वारी, अंडी, मसाले, फळे व भाजीपाला, मसूर(3 टक्के), गहू, तूर, बाजरी, पोल्ट्री चिकन (2 टक्के) यांच्या किमतीत वाढ झाली.
अखाद्य गटाच्या निर्देशांकात 0.6 टक्के वाढ होऊन तो 127.0 झाला. या आधीच्या महिन्यात तो 126.3 होता.
खनिज गटाच्या निर्देशांकात 2.3 टक्के घट होऊन तो 154.8 होता. या आधीच्या महिन्यात तो 158.4 होता.
कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस गटाच्या निर्देशांकात 3.1 टक्के घट होऊन तो 83.1 झाला. या आधीच्या महिन्यात तो 85.8 झाला.
इंधन आणि वीज
या गटाच्या निर्देशांकात 0.8 टक्के घट होऊन तो 101.3 झाला. त्याआधीच्या महिन्यात तो 102.1 होता.
निर्मित उत्पादने
या गटाच्या निर्देशांकात 0.1 टक्के घट होऊन तो 117.8 झाला. या आधीच्या महिन्यात तो 117.9 होता.
अन्नधान्य घाऊक किंमत निर्देशांक
अन्नधान्य घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर वाढून तो 9.02 टक्के झाला. ऑक्टोबर 2019 मध्ये तो 7.65 टक्के होता.
S.Tupe/S.Kakade/P.Kor
(Release ID: 1596642)
Visitor Counter : 156