कोळसा मंत्रालय

कोळसा मंत्रालयातर्फे शाश्वत विकास कक्ष

प्रविष्टि तिथि: 15 DEC 2019 5:33PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2019

 

देशात पर्यावरणदृष्ट्या शाश्वत कोळसा खाणींना उत्तेजन देण्यासाठी तसेच खाण बंदी वेळी पर्यावरणसंबंधीच्या चिंता दूर करण्यासाठी कोळसा मंत्रालयाने ‘शाश्वत विकास कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन खाजगी संस्था आता भविष्यातील महत्त्वपूर्ण बाबी बनवणार असल्याने या हालचालीला महत्त्व प्राप्त झाले आहे, याकरिता जागतिक पातळीवर उत्कृष्ठ पद्धतींच्या अनुषंगाने खाणींचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना विकसित केल्या जाणे आवश्यक आहे.

 

शाश्वत विकास कक्षाची भूमिका:

शाश्वत विकास कक्ष (एसडीसी) कोळसा कंपन्यांनी शाश्वत मार्गाने उपलब्ध स्रोतांचा अधिकाधिक उपयोग करण्याच्या उपाययोजना, सल्लागाराची योजना आखून त्यावर देखरेख ठेवेल. खाणकामाचा विपरित परिणाम कमी करण्यासाठी काम करेल. यासंदर्भात कोळसा मंत्रालयाच्या पातळीवर हा कक्ष क्षेत्रीय केंद्र म्हणून काम करेल. हा कक्ष खाण बंदी निधीसह पर्यावरणीय शमन उपायांसाठी भविष्यातील धोरणात्मक चौकट देखील तयार करेल.

 

कक्षाची कार्ये:

डेटा संग्रहण, डेटाचे विश्लेषण, माहितीचे सादरीकरण, माहितीवर आधारित नियोजन यापासून हा कक्ष एक पद्धतशीर दृष्टिकोन स्वीकारेल. डोमेन तज्ञांद्वारे, उत्कृष्ट पद्धतींचा अवलंब, सल्ला मसलत, नाविन्यपूर्ण विचारधारा, साईट-विशिष्ट दृष्टीकोन, ज्ञान सामायिकरण व प्रसार तसेच सर्वसाधारणपणे लोकांचे आणि समुदायांचे जीवन सुलभ करण्याच्या उद्देशाने कक्ष कार्यरत राहील.

 

S. Pophale/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1596530) आगंतुक पटल : 230
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English