इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

आर्थिक जनगणनेस दिल्लीत सुरुवात


डेटा सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी पहिल्यांदाच जनगणना पूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आली आहे

Posted On: 13 DEC 2019 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2019

 

शुक्रवारी सातव्या आर्थिक जनगणनेला राजधानी दिल्लीत सुरूवात झाली. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत ‘कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी)’ या ‘एसपीव्ही’शी करार केला आहे.

प्रथमच संपूर्ण जनगणना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर एका ऍप्लिकेशनच्या सहाय्याने आयोजित केली जात आहे; जी अचूकता व डेटा सुरक्षितता सुनिश्चित करेल. दिल्ली हे 26वे राज्य आहे, जेथे सर्वेक्षण सुरू केले गेले आहे, तर 20 राज्यांमध्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशात प्रक्रिया सुरू आहे. दिल्लीत संपूर्ण प्रक्रियेस सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे, जेथे गणना करणारे सुमारे 45 लाख आस्थापने व घरांचे सर्वेक्षण करतील, असे केंद्रीय सांख्यिकी कार्यालय (सीएसओ)चे महासंचालक (सामाजिक सांख्यिकी) श्री ए. के. साधू यांनी सांगितले.

 

M.Chopade/S.Pophale/P.Malandkar

 

 



(Release ID: 1596427) Visitor Counter : 118


Read this release in: English