संसदीय कामकाज मंत्रालय

संसदेचे हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले

दोन्ही सभागृहात 15 विधेयके मंजूर; लोकसभेची उत्पादकता 116 टक्के तर राज्यसभेची 100 टक्के

Posted On: 13 DEC 2019 6:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2019

 

सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 रोजी सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. या सत्रात 26 दिवसांच्या कालावधीत 20 बैठका झाल्या.

अधिवेशनादरम्यान लोकसभेत 18 विधेयके मांडण्यात आली. त्यापैकी लोकसभेने 14 विधेयके मंजूर केली तर राज्यसभेने 15 विधेयक मंजूर कली. 15 विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्याने ती संसद कायदे बनतील.

लोकसभेची उत्पादकता साधारण 116 टक्के इतकी होती तर राज्यसभेचे प्रमाण जवळपास 100 टक्के होते.

 

 

M.Chopade/S.Pophale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 (Release ID: 1596422) Visitor Counter : 55


Read this release in: English