वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

डिझाइन क्षेत्रातील शिक्षण आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी इंडिया डिझाइन काउन्सिलकडून दोन उपक्रमांचा प्रारंभ

प्रविष्टि तिथि: 12 DEC 2019 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2019

 

इंडिया डिझाइन काउन्सिलने आज नवी दिल्ली इथे चार्टर्ड डिझाइन्स ऑफ इंडिया (सीडीआय) आणि डिझाइन एड्युकेशन क्वालिटी मार्क (डीईक्यूएम) या दोन उपक्रमांचा प्रारंभ केला.

इंडिया डिझाइन काउन्सिल आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, अहमदाबाद यांच्या या दोन उपक्रमांमुळे, डिझाइनची (आरेखनाची) गुणवत्ता, शिक्षणातील गुणवत्ता, उद्योगातील डिझाइनसाठी प्राधान्यक्रम, सार्वजनिक उद्देशासाठी डिझाइन, श्रेणी या 5 आव्हानांना सामोरे जाण्यात साहाय्य मिळेल.

देशात डिझाइन क्षेत्रातल्या शिक्षणाला गती मिळत असून, सर्जनशील उत्पादन आणि अभिनव डिझाइन, मेक इन इंडिया उपक्रमात महत्वाची भूमिका बजावणारे आहेत.

 

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1596222) आगंतुक पटल : 180
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English