अवजड उद्योग मंत्रालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                10 DEC 2019 7:19PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2019
 
वाहनांमुळे होणारे प्रदुषण हे प्रदुषणाचे एक कारण असून, इलेक्ट्रिक वाहनांमुळे कार्बन उर्त्सजन होत नाही. देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करुन प्रदुषणाची समस्या कमी करता येऊ शकते. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अवजड उद्योग मंत्रालयाने फेम इंडिया म्हणजे फास्टर ॲडाप्शन ॲन्ड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स इन इंडिया ही योजना 2015 मधे सुरु केली. योजनेच्या पहिल्या टप्प्याला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. या इलेक्ट्रिक वाहनांमुळे 50 दशलक्ष लिटर इंधनाची बचत झाली असून, 124 दशलक्ष किलोग्रॅम कार्बन वायुच्या उर्त्सजनात घट झाली आहे. केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशासाठी 17 जुलै 2019 ला सूचनावली जारी केली आहे. याबरोबरच इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने इतरही पावले उचलली आहेत.
 
 
 
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
                
                
                
                
                
                (Release ID: 1595805)
                Visitor Counter : 134