अर्थ मंत्रालय
वस्तू आणि सेवा कर परतावा
52720 आयजीएसटी परतावे एक वर्षांपासून प्रलंबित
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2019 6:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2019
वस्तू आणि सेवा कर सुरु झाल्यापासून अनेक कंपन्यांनी परताव्यासाठी अर्ज केले. 2-12-2019 पर्यंत 1,86,158 आस्थापनांनी 36,42,272 परतावा अर्ज दाखल केले असून, त्यापैकी 34,46,010 परतावा अर्जांना अंतिम रुप देण्यात आले.
केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरातही माहिती दिली.
52,720 आयजीएसटी परतावे दावे एक वर्षाहून अधिक काळ प्रलंबित आहेत. अर्जदारांनी आवश्यक ती कागदपत्र सादर केली नसल्यामुळे हे दावे प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली आहे.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1595793)
आगंतुक पटल : 107
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English