अर्थ मंत्रालय
वस्तू आणि सेवा करविषयक तक्रारींचे वस्तू आणि सेवा कर केंद्राद्वारे निवारण
प्रविष्टि तिथि:
09 DEC 2019 7:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2019
जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करविषयक करदात्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सीबीईसी मित्रा, राष्ट्रीय नि:शुल्क क्रमांक आणि जीएसटी सेवा केंद्र उभारण्यात आली आहेत.
केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
जीएसटी पोर्टलविषयी करदात्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर टॅक्स नेटवर्कचे हेल्पडेस्क निर्माण करण्यात आले आहे. दूरध्वनीद्वारे अथवा सेल्फ हेल्प ग्रिव्हन्स रिड्रेसल पोर्टल जीआरपी https://selfservice.gstsystem.in द्वारे या हेल्पडेस्कशी संपर्क करता येतो.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1595658)
आगंतुक पटल : 93
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English