पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
पर्यावरण संवर्धनात जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी आणि पर्यावरण जागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ग्रीन गुड डीड’ उपक्रम
प्रविष्टि तिथि:
09 DEC 2019 5:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2019
समाजातल्या सर्वच घटकांमधे पर्यावरणविषयक जागृतीला प्रोत्साहन मिळावे आणि पर्यावरण रक्षणात जनतेच्या सहभागाला चालना मिळावी, यासाठी पर्यावरण वन आणि हवामानाबद्दल मंत्रालयाने ‘पर्यावरण शिक्षण, जागृती आणि प्रशिक्षण’ या योजनेशी समन्वय साधला आहे. या योजनेचा एक घटक असलेल्या राष्ट्रीय हरित सैनिक कार्यक्रमांतर्गत, शाळा आणि महाविद्यालयांमधे एक लाख पन्नास हजार इकोक्लब स्थापन करण्यात येत असून, पर्यावरण रक्षण आणि जतन याच्याशी संबंधित कार्यक्रमात सुमारे 35 लाख विद्यार्थी सक्रीय आहेत. ‘ग्रीन गुड डीड’ हा पर्यावरण रक्षणाप्रती विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब करु शकतील अशा छोट्या आणि रोजच्या व्यवहारात शक्य अशा सोप्या उपायांविषयीचा उपक्रम आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1595580)
आगंतुक पटल : 324
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English