पंतप्रधान कार्यालय

दिल्लीच्या अनाज मंडी येथे लागलेल्या आगीतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

Posted On: 08 DEC 2019 3:09PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2019

 

दिल्लीच्या राणी झाशी मार्गावरील अनाज मंडीत लागलेल्या आगीतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान म्हणाले, "दिल्लीच्या राणी झाशी मार्गावरील अनाज मंडीत लागलेली आग भीषण आहे. या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो. दुर्घटनाग्रस्त ठिकाणी प्रशासन शक्य ती सर्व मदत करत आहे."

 

D.Wankhede/S.Kane/P.Kor



(Release ID: 1595460) Visitor Counter : 63


Read this release in: English