आदिवासी विकास मंत्रालय
ट्रायफेडने पंतप्रधान वन धन योजनेचे 100 दिवस साजरे केले , फॅशन डिझायनर रितू बेरी यांच्याबरोबर केली भागीदारी
Posted On:
07 DEC 2019 7:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2019
देशभरातील आदिवासींना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान वन धन योजनेचे 100 दिवस पूर्ण झाल्याबद्दल आदिवासी कल्याण मंत्रालयाअंतर्गत ट्रायफेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्णा यांनी माध्यमांना माहिती दिली. तसेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर रितू बेरी यांच्याबरोबर ट्राइब्स इंडियाची भागीदारी केली. पंतप्रधान वन धन योजना बाजारपेठेशी संलग्न आदिवासी उद्यमशीलता विकास कार्यक्रम असून आदिवासी बचतगटांचे समूह बनवून त्यांचे बळकटीकरण केले जाणार आहे असे ते म्हणाले.
देशातील 27 राज्यांच्या सहभागाने या योजनेची सुरुवात करण्यात आली. अवघ्या 100 दिवसात 24 राज्यांकडून 799 वनधन विकास केंद्रे स्थापन करण्याचा प्रस्ताव आला असून 18 राज्यातील 676 वनधन विकास केंद्रांना ट्रायफेडने मंजुरी दिली आहे.
यावेळी बोलताना रितू बेरी यांनी ट्राईब्स इंडिया बरोबर काम करायला आणि त्यांच्या जागतिक दर्जाच्या उत्पादनांचा जगभरात ठसा निर्माण करायला उत्सुक असल्याचे सांगितले.
S.Tupe/S.Kane/P.Kor
(Release ID: 1595436)
Visitor Counter : 136