रेल्वे मंत्रालय
रेल्वेकडून 5500 रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा उपलब्ध
Posted On:
07 DEC 2019 4:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2019
रेल्वेने देशभरातील 5500 स्थानकांवर मोफत वायफाय सेवा पुरवण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे. मोफत वायफाय सेवा देणारे पूर्व मध्य रेल्वे मार्गावरील महुआ मिलन रेल्वे स्थानक 5500 वे स्थानक बनले आहे. जगातील सर्वात मोठ्या वायफाय सेवा पुरवणाऱ्यांपैकी हे एक वायफाय नेटवर्क असल्यामुळे ते खास आहे.
रेल्वे स्थानकांना डिजिटल समावेशी केंद्र बनवण्यासाठी रेल्वेने मोफत अतिजलद वायफाय सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 2016 मध्ये मुंबई सेंट्रल स्थानकापासून हा प्रवास सुरु झाला आणि 46 महिन्यांच्या कालावधीत देशभरात 5500 स्थानकांवर वायफाय सेवा यशस्वीपणे पुरवण्यात आली . यासाठी काही ठिकाणी रेल्वेने गुगल, टाटा ट्रस्ट, पीजीसीआयएल सोबत भागीदारी केली.
ऑक्टोबर 2019 मध्ये सर्व रेल्वे स्थानकांनवर रेलवायर वाय-फाय सेवांमध्ये एकूण 1.5 कोटी प्रवाशांनी लॉगिन केले आणि 10242 टीबी डेटा वापरला. या मोफत वायफाय सेवेमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील डिजिटल दरी सांधण्यास मदत होईल. विद्यार्थी , विक्रेते, दैनंदिन प्रवासी यांच्यासाठी हे वरदान ठरले आहे.
S.Tupe/S.Kane/P.Kor
(Release ID: 1595416)
Visitor Counter : 162