पंतप्रधान कार्यालय
एकल विद्यालय संगठनला पंतप्रधानांनी केले संबोधित
मुलांचे शिक्षण आणि विकासाला सातत्याने प्रोत्साहन दिल्याबद्दल संघटनेची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ला चालना देण्यासाठी खासगी आणि सरकारी शाळांना एकत्र आणण्याची पंतप्रधानांची सूचना
Posted On:
06 DEC 2019 4:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ मेसेजच्या माध्यमातून गुजरातमधल्या एकल विद्यालय संघटनेला संबोधित केले. ग्रामीण आणि आदिवासी मुलांमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकल स्कूल अभियान सुरू केल्याबद्दल पंतप्रधानांनी एकल विद्यालय संघटनेचे अभिनंदन केले. भारत आणि नेपाळमधल्या दुर्गम भागात राहणाऱ्या सुमारे 20 लाख 80 हजार मुलांना शिक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत दिलेल्या योगदानाबद्दल संगठनेच्या स्वयंसेवकांची त्यांनी प्रशंसा केली.
भारतात एक लाख शाळांचा आकडा पार केल्याबद्दल पंतप्रधानांनी संघटनेचे अभिनंदन केले. आवड समर्पण आणि वचनबद्धतेसह काम केल्यामुळे अशक्य उद्दिष्ट शक्य झाल्याचे ते म्हणाले. सामाजिक सेवेप्रती बांधिलकी आणि संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आदर्शामुळे गांधी शांतता पुरस्काराने संघटनेला गौरवण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
भारतात उत्तम शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी केंद्र सरकार उत्साहाने काम करत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. अनुसूचित जमातीच्या मुलांना शिष्यवृत्ती, एकलव्य मॉडेल निवासी शाळा, पोषण अभियान, मिशन इंद्रधनुष्य आणि आदिवासी उत्सवांच्या निमित्ताने शाळांना सुट्ट्या यांसारख्या योजनांमुळे शाळांमधल्या विद्यार्थ्यांची गळती रोखण्यात तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्यात मदत झाली.
2022 मध्ये स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करण्यासाठी संघटनेने शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासींची भूमिका अधोरेखित करण्यासाठी विशेष नाट्य, संगीत स्पर्धा, वादविवाद आणि चर्चात्मक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची सूचना केली. यावर्षी या स्पर्धा सुरू होऊन 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित करता येईल. एकल संस्था पारंपारिक भारतीय खेळांचा खेळ-महाकुंभ देखील आयोजित करू शकते, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी सरकारी आणि खासगी शाळांच्या जोड्या बनवण्याची कल्पना मांडली ज्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांकडून तर शहरी विद्यार्थी ग्रामीण विद्यार्थ्यांकडून नवीन गोष्टी शिकतील आणि यामुळे ‘एक भारत,श्रेष्ठ भारत’ संकल्पनेला चालना मिळेल. एकल संस्थेने ही शिक्षण आणि डिजिटायझेशनचा वापर केल्याबद्दल प्रशंसा केली. सर्व एकल विद्यालयांच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी रियलटाईम डॅशबोर्ड तयार करण्याची सूचना त्यांनी दिली.
आजच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीचे स्मरण त्यांनी करून दिले. बाबासाहेबांचे मूल आणि मुलींना समान शिक्षण देण्याचे स्वप्न साकारण्यात एकल संघटना यशस्वी झाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. चार दशकांच्या प्रदीर्घ प्रवासादरम्यान संघटनेने ‘पंचतंत्र शिक्षण मॉडेल’च्या माध्यमातून चाकोरीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन देत पोषण वाटीका, शेतीमध्ये जैव खतांचा वापरासाठी प्रशिक्षण, वनौषधींच्या औषधी गुणांच्या वापरासाठी कौशल्य शिक्षण, रोजगार प्रशिक्षण आणि सामाजिक जागृती केली. शिक्षण, पोलिसींग, उद्योग, सैन्य दल यांसारख्या विविध क्षेत्रात एकल विद्यालयांमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी देशाची सेवा करत आहेत, ही समाधानाची बाब असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
भारताने स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केली असून गांधीजींचा ग्राम स्वराज्य, बाबासाहेबांचा सामाजिक न्याय, दीनदयाळ उपाध्यायांचा अंत्योदय आणि स्वामी विवेकानंद यांचा वैभवशाली भारताचे स्वप्न साकार करण्यात एकल संघटनेचे यश सहाय्यभूत ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले.
N.Sapre/S.Kane/P.Kor
(Release ID: 1595295)
Visitor Counter : 115