गृह मंत्रालय

उष्णता लाट 2020: व्यवस्थापन, तयारी विषयक दोन दिवसीय कार्यशाळेचे बंगळुरूमध्ये आयोजन

Posted On: 05 DEC 2019 5:25PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2019

 

राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि कर्नाटक सरकारच्या सहकार्याने बंगळुरू येथे दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आजपासून आयोजन करण्यात आले आहे. आगामी काळात येणाऱ्या उष्णता लाट मौसमाच्या पूर्वीच ही कार्यशाळा घेण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षात जगभरात अती तीव्र हवामानातील उष्णतेची लाट ही महत्वाची बाब झाली आहे. हवामान बदलामुळे तापमानात आणि पर्यायाने उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढली आहे.

2018 मध्ये देशात उष्णतेच्या लाटेने बाधित राज्यांची संख्या 19 होती ती 2019 मध्ये 23 पर्यंत पोहोचली. अनेक शहरात आजपर्यंतच्या उच्चांकी तापमानाचीही नोंद झाली. काही शहरात पारा 45 अंशांपलिकडेही गेला.

उष्णतेच्या लाटेसंदर्भात राष्ट्रीय मार्गदर्शक तत्व आणि योजना या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor

 



(Release ID: 1595131) Visitor Counter : 71


Read this release in: English