वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पियुष गोयल यांच्या हस्ते तिसऱ्या राष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्र खरेदी बैठकीचे उद्‌घाटन

Posted On: 05 DEC 2019 5:21PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2019

 

केंद्रीय व्यापार, रेल्वे आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसेच राज्यमंत्री सोम प्रकाश यांच्या हस्ते तिसऱ्या राष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्र खरेदी बैठकीचे आज नवी दिल्लीत उद्‌घाटन झाले. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस आणि सीआयआयने संयुक्तरित्या या बैठकीचे आयोजन केले आहे.

ई मार्केट प्लेसने या मंचाच्या कार्यासाठी आवश्यक असणारा वेग, कौशल्य आदींची उच्च पातळी गाठली आहे, असे गोयल यांनी सांगितले. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसमध्ये उत्पादनांचा दर्जा आणि सेवा यांच्याशी तडजोड केली जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस म्हणजे सर्वंकषता, खुलेपणा आणि प्रामाणिकता यांचा सर्वोच्च बिंदू असल्याचे गोयल म्हणाले.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor

 


(Release ID: 1595130) Visitor Counter : 127


Read this release in: English