संरक्षण मंत्रालय

2014 पासून भारतीय संरक्षण उद्योगासोबत 1,96,000 कोटी रुपयांचे 180 हून अधिक करार

Posted On: 05 DEC 2019 5:14PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2019

 

2014 पासून संरक्षण मंत्रालयाने भारतीय संरक्षण उद्योगांसोबत 1 लाख 96 हजार कोटी रुपयांचे 180 हून अधिक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

माझगाव तसेच गोवा गोदी या दोन कंपन्यांना लढाऊ जहाजे बांधणीचे कंत्राट देण्यात आले आहे. भारतीय हवाई दल तसेच नौदलासाठी विकसित हलकी हेलिकॉप्टर निर्मितीचे कंत्राट हिंदूस्थान एअरोनॉटीकल लिमिटेडला देण्यात आले आहे. डॉर्निअर विमाने निर्मितीचे कंत्राटही याच कंपनीला फेब्रुवारी 2015 मध्ये देण्यात आले आहे.

बीईएल कंपनीला आकाश क्षेपणास्त्र प्रणालीच्या सात तुकड्या निर्मित करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत लसिन-टुब्रेा कंपनीला तोफांचे कंत्राट देण्यात आले आहे.

या खेरीज संरक्षण दलांनी टिटागट वॅगन्स लिमिटेड, फोर्स मोटर्स लिमिटेड, टाटा पॉवर टेक महिंद्रा आदी खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांसोबतही विविध करार केले आहेत.

याशिवाय मेक टू अंतर्गत 44 नव्या प्रकल्पांना मंजुरीही देण्यात आली आहे.

 

S.Tupe/J.Patankar/P.Kor

 



(Release ID: 1595126) Visitor Counter : 143


Read this release in: English