वित्त आयोग
15 व्या वित्त आयोगाने 2020-21 चा अहवाल राष्ट्रपतींना केला सादर
प्रविष्टि तिथि:
05 DEC 2019 5:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2019
15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन.के. सिंग तसेच इतर सदस्यांशी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन या आर्थिक वर्षासाठीचा अहवाल पुढील कारवाईसाठी सादर केला. या अहवालात करण्यात आलेल्या शिफारशींची माहितीही त्यांनी राष्ट्रपतींना दिली.
15 व्या वित्त आयोगाची 27 नोव्हेंबर 2017 रोजी स्थापना करण्यात आली असून 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी या आयोगाने शिफारशी सादर करायच्या आहेत.
27 नोव्हेंबर 2019 रोजी जारी केलेल्या राजपत्रित अधिसूचनेनुसार 15 व्या वित्त आयोगाने 2020-21 या आर्थिक वर्षासाठीचा अहवाल 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत सादर करणे बंधनकारक होते. तसेच 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या कालावधीचा अंतिम अहवाल 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत सादर करायचा आहे.


B.Gokhale/J.Patankar/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1595123)
आगंतुक पटल : 206
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English