Posted On:
03 DEC 2019 5:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2019
सूर्य किरण-14 या भारत आणि नेपाळ लष्करांदरम्यानच्या 14 व्या द्विपक्षीय वार्षिक लष्करी कवायतींना आज नेपाळमधल्या रुपनदेही जिल्ह्यातल्या नेपाळ लष्कर युद्धशाळा येथे प्रारंभ झाला. तेराव्या संयुक्त कवायतींचे उत्तराखंडमधल्या पिथोरागड येथे गेल्यावर्षीच्या जूनमध्ये आयोजन करण्यात आले होते.
भारतीय लष्कर आणि नेपाळचे लष्कर यांदरम्यान तुकडी स्तरावर एकत्रित प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा या कवायतींचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये जंगलातील युद्ध, डोंगराळ भागातील दहशतवाद विरोधी मोहीम, आपत्ती निवारण आदी विषयांचा या कवायतींमध्ये समावेश आहे.

S.Tupe/J.Patankar/P.Kor