कृषी मंत्रालय

2018-19 मध्ये भारतातून सेंद्रीय शेतीतील 5150 कोटी 99 लाख रुपयांच्या उत्पादनांची निर्यात-नरेंद्र सिंग तोमर

Posted On: 03 DEC 2019 4:41PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2019

 

परंपरागत कृषी विकास योजना आणि पूर्वोत्तर भागातील सेंद्रीय शेती साखळी विकास मिशन अंतर्गत 2015-16 पासून भारत सरकार देशातील सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देत आहे. शेतकरी निर्माता संघटनांमार्फत या दोन्ही योजनांचा प्रचार करण्यात येत असून या दोन्ही योजना रसायनमुक्त आणि शाश्वत सेंद्रीय शेतीच्या प्रसार तसेच बाजारपेठांशी जोडणीद्वारे कच्चा माल खरेदीला आधार/समर्थन देणाऱ्या आहेत. सेंद्रीय शेतीला राष्ट्रीय कृषी विकास योजना तसेच फळबागा एकात्मिक विकास मिशन आदींच्या अंतर्गत पाठिंबा दिला जातो.

2018-19 या वर्षात महाराष्ट्रातून इतर राज्यांसोबत सुमारे 1 कोटी 24 लाख 75 हजार क्विंटल उत्पादन घेण्यात आले.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor

 


(Release ID: 1594708)
Read this release in: English