पंतप्रधान कार्यालय

अध्यक्ष पंतप्रधान मोदी यांची युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष महामहीम उर्सुला व्हॉन डर लियेन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा

Posted On: 02 DEC 2019 11:11PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डर लियेन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी उर्सुला यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या कार्यकाळात सुरुवातीलाच संपर्क साधता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. युरोपियन कमिशनच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्यामुळे त्यांचे नेतृत्व कमिशनसाठी विशेष महत्वपूर्ण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

लोकशाही, कायद्याच्या नियमांबदृदल आदर, बहुआयामीत्व, नियमांवर आधारीत व्यापार आदी सामायिक मूल्ये यावर भारत-युरोपियन युनियनची भागीदारी आधारीत आहे, हे पंतप्रधान मेदी यांनी अधोरेखित केले. हवामान बदल, जोडणी, नवीकरणीय ऊर्जा, सागरी सुरक्षा मूलतत्ववाद आणि दहशतवादाचा सामना यासारखे प्रश्न निश्चित करून त्यांच्याकडे प्राधान्याने लक्ष देत असल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली. भारत-युरोपियन युनियन भागीदारी अधिक मजबूत करण्याबाबतची तीव्र इच्छाही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी यांना आगामी भारत युरोपियन युनियन शिखर परिषदेसाठी ब्रुसेल्सला भेट देण्यासाठी उर्सुला व्हॉन डर लियेन यांनी निमंत्रण दिले. पंतप्रधान मोदींनी त्या निमंत्रणाचा आदरपूर्वक स्वीकार केला.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1594692) Visitor Counter : 102


Read this release in: English