पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
समुद्र किनाऱ्यांसाठी ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र
प्रविष्टि तिथि:
02 DEC 2019 7:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2019
देशातल्या निवडक समुद्रकिनाऱ्यांसाठी ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
पर्यावरण, शिक्षण आणि माहिती, पर्यावरण व्यवस्थापन आणि जतन, समुद्र किनाऱ्यांची सुरक्षितता यासारख्या चार विभागातल्या 33 कठोर निकषांवर आधारित डेन्मार्कमधल्या आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी प्रायोगिक तत्वावर 13 समुद्रकिनाऱ्यांची निवड करण्यात आली असून यात महाराष्ट्रातल्या भोगावे, तामिळनाडूतल्या कोवालम, गोव्यातल्या मीरामार समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1594595)
आगंतुक पटल : 437
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English