आदिवासी विकास मंत्रालय
एकलव्य आदर्श निवासी शाळांचे आधुनिकीरण
प्रविष्टि तिथि:
02 DEC 2019 7:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2019
मंजूरीप्राप्त एकलव्य आदर्श निवासी शाळांना त्यांच्या गरजांनुसार आधुनिकीकरणासाठी आणि सुधारणांसाठी प्रती शाळेला जास्तीत जास्त 5 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य आदिवासी विकास मंत्रालयामार्फत देण्यात येत आहे.
वर्गखोल्यांचे नुतनीकरण, अतिरिक्त वर्गासाठी बांधकाम, सुसज्ज प्रयोगशाळा, सध्याच्या वसतीगृहांचे नुतनीकरण, वसतीगृहासाठी अतिरिक्त खोल्यांचे बांधकाम, नवी स्वच्छतागृहे बांधणे, वाचनालये, मैदाने सुधारणे यांचा यात समावेश आहे.
केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री रेणुकासिंग सरुता यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1594576)
आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English