रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

अपघातप्रवण क्षेत्र निश्चित करून अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना

Posted On: 02 DEC 2019 6:57PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2019

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ‘एकात्मिक रस्ते अपघात डाटाबेस’ हा प्रकल्प हाती घेणार असून त्यासाठी जागतिक बँकेकडून निधी पुरवला जाणार आहे. ॲपवर आधारित सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अपघातप्रवण क्षेत्र ओळखून अपघातांविषयी आकडेवारी आणि माहिती गोळा करण्याचा यामागचा उद्देश आहे. 2011 ते 2014 या काळात 789 अपघातप्रवण क्षेत्रे निश्चित करण्यात आली असून अशा 395 क्षेत्रांमध्ये दुरुस्ती करण्यात आली असून अपघात प्रवण 215 क्षेत्रांवर दुरुस्तीबाबत अंमलबजावणी सुरू आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor

 


(Release ID: 1594574) अभ्यागत कक्ष : 112
Read this releasein: English