सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
एमएसएमईच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात 29.7 टक्के तर देशाच्या निर्यातीत 49.66 टक्के योगदान
Posted On:
02 DEC 2019 6:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2019
सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाचे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात 29.7 टक्के तर निर्यातीत 49.66 टक्के योगदान राहिले आहे. सरकारने क्रेडीट लिंक्ड कॅपिटल सबसिडी ॲण्ड टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन स्कीम, सूक्ष्म आणि लघु उद्योग-समूह विकास कार्यक्रम आंतरराष्ट्रीय प्रदर्शने, व्यापारी मेळे, परिषदा, कार्यशाळात सहभागी होण्यासाठी सहकार्य याद्वारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1594567)
अभ्यागत कक्ष : 106