युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

क्रीडापटूंसाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रम

Posted On: 02 DEC 2019 2:56PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2019

 

युवा आणि क्रीडा मंत्रालय 8 ते 25 वयोगटातल्या निवडक गुणवान क्रीडापटूंना प्रशिक्षण देते. मंत्रालयाच्या विविध योजनांअंतर्गत 14669 क्रीडापटूंना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यापैकी 8701 क्रीडापटूंना पूर्णवेळ निवासी प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) किरेन रिजीजू यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. प्रशिक्षण, क्रीडा साधने, स्पोर्टस् किट, शैक्षणिक खर्च, योजनेच्या निकषाप्रमाणे वैद्यकीय/विमा आणि भत्ता या स्वरुपात क्रीडापटूंना मदत पुरविण्यात येते.

विविध योजनांतर्गत नियमित प्रशिक्षणासाठी खेळाडूंची निवड करण्याचे निकष https://sportsauthorityofindia.nic.in  आणि https://kheloindia.gov.in   वर उपलब्ध आहेत.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1594469) अभ्यागत कक्ष : 90
Read this releasein: English