रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
15 डिसेंबर 2019 पासून देशभरात फास्टटॅग अनिवार्य
Posted On:
30 NOV 2019 4:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2019
देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोलनाक्यावर फास्टटॅग अनिवार्य करण्यासाठीची तारीख 15 डिसेंबर 2019 पर्यत पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. आधी ही योजना 1 डिसेंबरपासून लागू होणार होती.
इंधनबचत, वेळेची बचत,जलद वाहतूक आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय इलेक्ट्रोनिक टोल संकलन कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाअंतर्गत, RFID तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व वाहनांवर लावण्यात येणाऱ्या फास्टटॅग च्या मदतीने परस्पर टोल भरला जाईल, ज्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचणार आहे. मार्गिका असलेल्या (दोन्हीबाजूंनी केवळ एक मार्गिका असलेले रस्ते वगळता) देशभरातल्या सर्व मार्गिकांवरच्या टोल नाक्यांवर 1 डिसेंबर पासून फास्टटॅग योजना कार्यान्वित आणि अनिवार्य केली जाणार होती.
सर्व टोलनाक्यांवर ही व्यवस्था करण्यात आली असून MyFASTag APP माय फास्टटॅगऐप देखील विकसित करण्यात आले आहे.
मात्र अद्याप अनेक नागरिकांनी आपल्या वाहनांवर फास्टटॅग लावले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही मुदत 15 डिसेंबरपर्यत वाढवण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे.
S.Tupre/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1594362)
Visitor Counter : 230