वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

आठ महत्वपूर्ण उद्योगांचे निर्देशांक (आधार: 2011-12=100)

Posted On: 29 NOV 2019 6:11PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2019

 

आठ महत्वपूर्ण उद्योगांचा निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात 5.8 टक्क्याने कमी होऊन 127 इतका राहिला. एप्रिल ते ऑक्टोबर 2019-20 दरम्यान एकत्रित वाढ 0.2 टक्के इतकी राहिली.

कोळसा

ऑक्टोबर 2019 मध्ये कोळशाच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 17.6 टक्क्याने घट झाली. एप्रिल ते ऑक्टोबर 2019 दरम्यान या क्षेत्राचा एकत्रित निर्देशांक गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.8 टक्क्याने कमी राहिला.

खनिज तेल

ऑक्टोबर 2019 मध्ये खनिज तेलाच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 5.1 टक्क्याने घट झाली.

नैसर्गिक वायू

ऑक्टोबर 2019 मध्ये नैसर्गिक वायूच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 5.7 टक्क्याने घट झाली.

रिफायनरी उत्पादने

ऑक्टोबर 2019 मध्ये पेट्रोलियम रिफायनरी उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 0.4 टक्क्याने वाढ झाली.

खते

ऑक्टोबर 2019 मध्ये खतांच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 11.8 टक्क्याने वाढ झाली.

पोलाद

ऑक्टोबर 2019 मध्ये पोलाद उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 1.6 टक्क्याने घट झाली.

सिमेंट

ऑक्टोबर 2019 मध्ये सिमेंटच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 7.7 टक्क्याने घट झाली.

वीज

ऑक्टोबर 2019 मध्ये वीज निर्मितीत ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 12.4 टक्क्याने घट झाली.

नोव्हेंबर 2019 साठीच्या औद्योगिक निर्देशांक 31 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor

 


(Release ID: 1594288) Visitor Counter : 113


Read this release in: English