नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
सौर ऊर्जा निर्मिती
Posted On:
28 NOV 2019 3:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर 2019
केंद्र सरकारने डिसेंबर 2022 पर्यंत 1 लक्ष मेगावॅट इतकी वीज सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे निर्मित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी केलेल्या गणतीत देशात एकूण 31 हजार 696 मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती झाली आहे. याशिवाय 17 हजार 998 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प निर्माणाधीन आहेत. 36 हजार मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी या आधीच निविदा काढण्यात आल्या आहेत. या प्रयत्नांमुळे केंद्र सरकारची सौर ऊर्जा उद्दिष्टपूर्ती दृष्टीपथात आली आहे.
सौर ऊर्जा निर्मितीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात वेगळी तरतूद नसली, तरी विविध सौर ऊर्जा कार्यक्रमांमधून प्रकल्पासाठी निधी दिली जातो. ऑक्टोबर अखेरपर्यंत केलेल्या गणतीनुसार रुपये 1513 कोटी निधी देण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षात एकूण निधी रुपये 2524 कोटी एवढा देण्यात आला होता. गेल्यावर्षी महाराष्ट्राने 2503 दशलक्ष युनिट सौर ऊर्जा निर्मिती केली होती. देशभरात ही संख्या 39 हजार 268 दशलक्ष युनिट होती. महाराष्ट्रात सात सोलर पार्क निर्माणाधीन आहेत.
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा, वीज आणि कौशल्य विकास आणि उद्यमशीलता (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्री आर के सिंग यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
G.Chippalkatti/D.Rane
(Release ID: 1594201)
Visitor Counter : 120