दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

मुंबई दक्षिण डाक अदालत

Posted On: 27 NOV 2019 4:43PM by PIB Mumbai

 

मुंबई, 27 नोव्हेंबर 2019

 

टपाल सेवा हा देशातील सामाजिक आर्थिक जीवनाचा एक महत्वाचा घटक आहे, टपाल खाते आपल्या ग्राहकांच्या समाधानापर्यंत सेवा पुरवण्याचा कसोशीने प्रयत्न करते. परंतु सेवांमध्ये काही त्रुटी राहतात. त्यांचा निपटारा करण्यासाठी टपाल खाते नियमितपणे ‘डाक अदालतीचे’ आयोजन करत असते. या अदालतींमध्ये ग्राहकांच्या तक्रारीचे स्वरूप जाणून घेऊन त्यांना सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला जातो.

टपाल खात्याच्या मुंबई दक्षिण विभागाच्या वरिष्ठ अधीक्षकांनी या क्षेत्रातील टपाल तक्रारींसंदर्भात एक ‘डाक अदालत’ 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता भरणार आहे. तिची जागा टपाल अधीक्षक, मुंबई दक्षिण विभाग, पाचवा मजला, नवी विस्तारीत इमारत, जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) मुंबई 400001 येथे आयोजित करण्यात आली आहे.

सहा आठवड्यात ज्या टपाल विषयक तक्रारींचा निपटारा झालेला नाही अशा मुंबई दक्षिण विभागाच्या अखत्यारीतील तक्रारी या अदालतीत ऐकण्यात येतील व त्यावर तोडगा काढला जाईल. तक्रारदारांनी मूळ तक्रार कोणत्या अधिकाराऱ्याकडे केली होती आणि अन्य तपशीलासह आपली तक्रार सादर करावी असे टपाल खात्याकडून कळवण्यात आले आहे.

संबंधित तक्रारदारांनी त्यांची तक्रार रमेश सोनावले, जेष्ठ टपाल अधीक्षक, मुंबई दक्षिण विभाग, पाचवा मजला, नवी विस्तारीत इमारत, जी.पी.ओ. मुंबई 400001 येथे 27 नोव्हेंबर पर्यंत सादर करावी असे याबाबतच्या सूचनेत म्हटले आहे.

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1594041) Visitor Counter : 115
Read this release in: English