माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मनोरंजन, अर्थ आणि मोहिनी ही मोहसिन मखमलबाफ यांच्या चित्रपटाची तीन वैशिष्ट्ये: निर्माते, संकलक मायसम मखमलबाफ
गोवा, 28 नोव्हेंबर 2019
सुप्रसिद्ध इराणी चित्रपट दिग्दर्शक मोहसिन मखमलबाफ यांनी दिग्दर्शित केलेला ‘मार्गे अँड हर मदर’ हा चित्रपट वास्तववादी चित्रपट असून, त्यात इटलीचा नववास्तववाद आणि इराण मधल्या नव्या पिढीमधल्या आधुनिकतेचा संगम आहे. क्लॉडिया आणि तिची मुलगी मार्घे यांच्या आयुष्यात आर्थिक ओढाताणीमुळे आलेल्या अडचणींचे परिणामकारक चित्रण या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या महोत्सवाच्या समारोप प्रसंगी हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

मोहसिन मखमलबाफ यांनी आतापर्यंत विविध देशांमध्ये 10 चित्रपट बनवले आहेत आणि या चित्रपटांमध्ये त्या त्या देशांचा आत्मा दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. यावेळी मोहसिन यांच्या चित्रपट निर्मिती शैलीविषयी मायसम यांनी माहिती दिली. त्यांचे चित्रपट तीन स्तरांचे असतात, त्यातला पहिला स्तर म्हणजे मनोरंजन, दुसरा स्तर सामाजिक, मनोवैज्ञानिक आणि तत्वज्ञानावर आधारीत अर्थपूर्ण आशय आणि तिसरा म्हणजे चित्रपटाची मोहिनी. चित्रपटाची मोहिनी म्हणजे एक गारुड असते. त्याच्या चित्रपटाचे चाहतेही आपल्याला सिनेमातले नेमके काय आवडले हे सांगू शकत नाहीत, असे मायसम म्हणाले.
‘मार्गे अँड हर मदर’ चित्रपट एका छोट्या कॅमेराने चित्रित करण्यात आला आहे.
G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
(Release ID: 1594033)
अभ्यागत कक्ष : 165