शहर विकास मंत्रालय
पंतप्रधान आवास योजनेत 96 लक्ष 50 हजार घरांच्या बांधकामास मंजुरी
Posted On:
27 NOV 2019 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2019
पंतप्रधान आवास योजनेत एकूण 1 कोटी 12 लक्ष घरे बांधण्याचे प्राथमिक चाचणीनंतर ठरवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 96 लक्ष 50 हजार घरांच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. एकूण 56 लक्ष घरांचे बांधकाम सुरु झाले आहे. त्यापैकी 28 लक्ष 40 हजार घरे बांधून पूर्ण झाली आहेत.
पंतप्रधान आवास योजनेच्या आज झालेल्या 49व्या बैठकीत केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीने शहरी भागातील 3 लक्ष 31 हजार 75 घरांच्या बांधकामाला मंजुरी दिली. यात महाराष्ट्रातील 4 हजार 691 घरांच्या मंजुरीचा समावेश आहे. आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशात या योजनेखाली सर्वाधिक घरे बांधण्यात आली आहेत.
G.Chippalkatti/D.Rane
(Release ID: 1594031)